Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९४] श्री. नोव्हेंबर १७४९.
राजश्री कोन्हेरपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणोन. स्वकीय कुशललेखन केले पाहिजे. विशेष. वेदमूर्ति राजश्री रघुनाथभट येथें आलें. त्यांणी तुह्मास पत्र पाठविले आहे. त्यावरून कळो येईल. राजश्री फत्तेसिंगबाबा भोसले यांचा व आमचा करार तुमचेच विद्यमाने जाहाला आहे. त्यास, हाली राजश्री अंबाजीराम पाठविले आहेत हे सविस्तर अर्थ सांगतील. तो अर्थ चित्तांत आणून मशारनिलेनीं सत्वर निघावयाचा विचार केला पाहिजे. व तुह्मी सत्वर येतो ह्मणोन आह्मापाशीं करार केला आहे, अद्यापि आला नाहीं. तरी पत्र पावतांच अविलंबे आले पाहिजे. र॥ छ ११ माहे रमजान. + तुह्मीं आह्मासी करार केला होता कीं, मागून दों महिन्यां येतों. ते आजून आलां नाहीं. तर आता देखत पत्र आता येणें. अनमान सहसा न करणें. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनंति.