Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१८४] श्री. ३० सप्टेंबर १७५२.
* राजश्री कान्हेरपंत गोसावी यासी :-
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. विशेष. आमचाहि वृद्धापकाळ व तुमचाहि वृद्धापकाळ. ऐशा प्रसंगामधी तुह्मीं व आह्मीं विभक्त असावें हे विश्वरास मानत नाहीं. याउपर कितेक गोष्टी तुह्मास व आह्मास सांगितल्या त्या उभयतांनी चित्तांत आणाव्या. पूर्ववत्प्रमाणें एकचित असलियाणें सर्व उत्तम आहें, ऐसें चित्तांत आनून, हे पत्र लक्ष पत्रांचे जागा माणून, तुह्मीं चिरंजीव बाबूरायास घेऊन येणें. हिकडील सर्वार्थ विसोबा सांगता कळूं येईल. तुह्मी यावयास अनमान कराल तर तुह्माला आमच्या गळ्याची आन असे. र॥ छ १ जिलकाद. बहुत काय लिहिणें. विनंति.