Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७९] श्री. २२ सप्टेंबर १७२८.
श्रीसच्चिदानंदकंद भृगुनंदनस्वरूप पारावारीण यमनियमाद्यष्टांग योगसाधन श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंग्रे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल भाद्रपद वद्य अमावस्या रविवासरपर्यंत स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामीनीं आशीर्वाद पत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन बहुत समाधान जाहलें. पूर्वऋणानुबंधेकरून कोंकणांत येणें जाहलें, व तुह्माकडेस तुलसीदल आहे, ते नकदी तुह्माकडेस आहेच, व्याजाचा हिशेब येणें, व हत्तीमुळें पंचवीस हजार रुपये पडिले इत्यादिक, व गोठणे श्रीस द्यावे, ह्मणोन लि॥, तें विदित जाहले. ऐशास, ऋणानुबंधेकरूनच अवघे पदार्थ घडतात. ते गोष्टीचे सामान्य पक्ष असतील त्यांणी सुखदु:ख न मानावें. आणि स्वामी तो परमहंस, सुखदु:खातीत स्वामी असतां क्षणक्षणा फलाण्यामुळें फलाणें जाहलें. हत्तींमुळे फलाणें गेले, या प्रकारें स्वामी लेहून पाठवितात, याचा विचार काय? हा मोह मनुष्यास न व्हावा. यास्तव याविशी कितेक श्रुति, स्मृती प्रवर्तल्या आहेत. ऋणानुबंधिन: सर्वे पशुपत्निसुतादय: ॥ऋणक्षये क्षयं यांति का तत्र प्रतिवेदना ॥ १॥ इत्यादिक शास्त्रार्थावरून कोणाचे काय गेले व कोणीं नेले ? याउपरी स्वामीस उचित नाहीं कीं, जाहले गोष्टीची क्षीत मानून लिहून पाठवावें. सर्व गोष्टीस भगवदिच्छा प्रमाण असे. वरकड इकडेस तुलसीदल आहे त्याच्या व्याजाचा अर्थ लिहिला, तरी ऐसे विचार तोंडीच असत नाहीं. आमचें काहीं लिहिले पुसले स्वामी जवळ असिले तरी आह्मी व्याज देऊन. अन्यथा एक टक्काहि व्याज ह्मणोन देणार नाही. आह्माकडून प्रतिवर्षी स्वामीस पावतें. त्याचा आजि त॥ हिशेब करून स्वामीकडेस बाकी निघेल ते स्वामीस कळलीच आहे. गोठणेयाचा मजकूर तरी, भटास दिल्ही वोसरी तो भट पाय पसरी,हा लेख जाहला. असो. स्वामीपेक्षां आह्मांस विशेष काय आहे ? गोठणेयाची सनद पाठविली असे. गांवीची लावणी संचणी होऊन माहूर गांव होय ते गोष्टी केली पाहिजे. वरकड स्वामीनीं आज्ञा केली, त्याचें उत्तर अलाहिदा पत्रीं लि॥ आहे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धामान करावी. हे विनंति.