Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१६३] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. तुह्मी हुंडी केली त्याप्रमाणें हुंडी सर्वची करून दिली. जे जबाबी होती तेही पाठविली. जबाब श्रीचे येतांच पाठवून. पठाणाचा व वजिराचा हर्षामर्ष, मार्ग चालत नाहीं, ऐवज परम संकटें श्रीस पावतो. हल्लीशिक्केयासी भाव श्रीमध्यें दरसद्दे रुपये पांच जाले आहेत. याजकरितां कांही हुंडणावळ मिळेल तर घेत जाणें. पठाणांनीं बहुत धूम केली आहे. चहूंकडे मोठा दंगा आहे. राजे ईश्वरसिंग विष भक्षिलें, मेले. राज्य माधोसिंगास दिल्हे. श्रीमंताचें पुण्य समर्थ ! नासरजंगासारखा रिपु अनायासें वारला ! दाभाडियाची कितेक गौरीच आहे. गडकिल्ला त्याजकडे नाहीं. त्याचे हातें कांहीं होत नाहीं. त्यास, जें वर्तमान होत जाईल तें लिहीत जाणें. मातोश्री ताराबाईंनी मनसुबा काय योजिला आहे तें लिहिणें. तिणें त्याप्रमाणें मनसुबा केला ! पुढें श्रीमंतांनीं काय योजना केली तें लिहिणें. वरचेवर साद्यंत वर्तमान लिहीत जाणें. गडबडेचा प्रसंग आहे, याजकरितां वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. मीरखान, जगदळे, अद्याप आले नाहींत. येथे फौजेविना काम होत नाहीं. रांगडे लोक ! रांगडी रयत ! ते कोठे आहेत हेहि कळत नाहीं. देशी असिलें तर श्रीमंताकरवीं ताकीद करवणें. आह्मी याजउपरी यमुनातीर प्रांतें जाऊन. पैसा कोठीलही वसूल होत नाहीं. जान विकत नाहीं असे परम संकट आहे. नासरजंग वारलेयावर कोण नवाब जाले ? श्रीमंताशीं त्यांशी कसे सख्य आहे तें लिहिणे. ताराबाई यांहीं संभाजीराजे यांशी पैगाम केला आहे किंवा काय ? तें लिहिणें. सारांश, वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. ताराबाईजवळ कोण कोण फितुरांत आहे तेहि लिहिणें. दाभाडियांशी सलूखच होईल. त्यास, श्रीमंतांशी व दाभाडियांशी सलूख जालियावर श्रीमंत कोणीकडे जाणार, काय मनसुबा, तो लिहिणें. सातारा कांही श्रीमंताची फौज आहे किंवा नाहीं, तें लिहिणें. मित्ती वाघ वद्य ११. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.
[१६४] श्री. १२ जानेवारी १७५१.
चिरंजीव राजश्री बाबूराव यासी गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरी. पेशजी तुह्मांस लिहिले होते जे प्रीथीसिंगास चाकरीस येणे ह्मणोन. त्यास, तुह्मी सातारा गेला होता. त्यास, हालीं तुह्मी श्रीमंताजवळ आला असाल. त्यास, एक थैली श्रीमंताचे नावें राजे प्रीथसिंग याजला पाठविणें जे प्रस्तुत फौजेचें जरूर कामकाज आहे. त्यास, तुह्मी आपले फौजेनसी खासापंताजवळ जाऊन सामील होणें, विलंब न करणें, ह्मणून पत्र जरूर पाठविणें. वरचेवर दरबारचे वर्तमान लिहीत जाणें. मित्ती माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.