Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
दमाजी गायकवाड याजकडे सालबंदी ऐवज करार केला बु॥ हु॥ गु॥ ६२५००० नजर सु॥. व भीवराव यास दूर केले सबब एक लाख. व गणेश यादव बर्वे पोतदार व कृष्णाजी नाईक कोल्हटकर एकंदर असामींच॥ ४ हजार व सांदड, विहीर, उजई, अंतापूर, मक्ता १० हजार एकूण ७५४००० करार केले. पर्वतीवर नवें घर बांधिलें त्याची वास्तू साबान महिन्यांत (जून १७५५) केली. त्र्यंबकेश्वरचें काम पुरें जालें. १९ मार्च १७५५ इंग्रजांशी तह झाला. तो आंग्रे यांजकडील मुलूख घेऊन बाणकोट देण्याब॥ असावा. नदेशांतील अहिवंतगड किल्ला खोजे दायम याजकडून घेऊन परगणे अठेरपाळेपैकीं कळवण हा गांव दिल्हा. तुळाजी आंग्रे यास कैद केलें. हिंदुस्थान प्रकरणी वर्तान :- गेले सालीं कुंभेरीवरील लढाईत दत्ताजी शिंदे व त्याचा भाऊ जयाप्पा शिंदे दादासाहेब यांजबरोबर होते. येथील कार्यभाग आटोपल्यावर दादासाहेब यांनी जयाप्पा यास मारवाडांत पाठविलें. रामसिंग व बजेसिंग या उभयतांचे तक्तासंबंधी भांडण लागलें होतें. त्यास रामसिंगाचे मदतीकरितां पाठविलें. तेथे बजेसिंगाशी युध्द होतां होतां बजेसिंग पळून गोरात गेला. येथें जयप्पानीं मोर्चे लावून युध्द होत असतां तो जेर जाला. तेव्हां बजेसिंगानें मारेकरी घालून जयाप्पास मारिले. जयाप्पाचा मुलगा जनकोजी. त्यास जयाप्पानें रामसिंगाबरोबर मेडतें येथें रवाना केले होतें. तो जयाप्पा मेला त्या दिवशीच मेडतें सर करून तिसरे दिवशी नागोरास आला. जयाप्पाची क्रिया त्यानें केली. जयाप्पा व संताजी शिंदे वेढ्यांत मरण पावले. त्यांच्या छत्र्या पुष्कराजवळ आहेत. पुढें दतबा व जनकोजी आणखी नागोरास आले. बजेसिंग जेर होऊन कोट रुपये खंडणी व अजमीर, मेडतें व बिकानीर त्याजपासून घेतले. शिंदे उज्जनीस गेले. अजमीर घेतल्याचें वर्तान छ १९ रजब, वैशाख वद्य ७ शुक्रवारी (२ मे १७५५) पेशवे यांस कळलें. दादासाहेब हिंदुस्थानांत आहेत. छ १५ रबिलावलापासून (३० डिसेंबर १७५४) मु॥ गणमुक्तेशर. छ ४ रबिलाखर (जानेवारी १७५५) पुष्पावतीवर. साबान अवलसाल (५ जून १७५५) मथुरा. छ ११ जमादिलावल (२३ फेब्रुवारी १७५५) पुष्कर. छ २७ रबिलाखर यमुनातीर छ १२ जमादिलावल अजमीर. याप्रमाणें या सालीं हिंदुस्थानांतच राहिले.