Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                               लेखांक ९६.                                                         १७१४ पौष वद्य १०.
पु।। राजश्री तिमणा नाईक स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि घटाले यांस व अमोलिकराम वकीलाचें दोन पत्रें पारसी लखोटे पाठविले हे देऊन सतरा हजार अडिचसें रुपये त्यांजकडून घेऊन स्वार प्यादे मागोन घेऊन ऐवज नगदी रवाना करावा सदरहु ऐवजाची रसीद खानमार याणी आमची मागीतल्यास रसीद पा आहे ऐवज सवासतरा हजार झाडून पदरी घेऊन मग रसीद द्यावी ऐवज बहुत माफजादीने एथें पोहचत करावा हुंड्याची सोय असल्यास हुंड्या करून पाठवाव्या त्याची हुंडावन भावा प्रा खानमार याणी दिल्यास हुंड्या पाठवाव्या हुंडावन देण्यास दिकत करतील तर नगदी ऐवज हैदराबादेस आपले प्यादे स्वार देऊन पोंहचता करावा ऐसें बोलावें येविषी त्यांजला आह्मी व अमोलिकराम याणी लिहिलें आहे ऐवज घेऊन रसीद अमोलिकराम यांजपासी देऊ यात्रा प्रथम बोलावें रसीद घेतल्यासिवाय ऐवज देण्याची दिकतच पडली तर ऐवज झाडून घेऊन मग रसीद द्यावी थोडाबहुत ऐवज देऊं लागल्यास रसीद देऊ नये माघारी पाठवावी समजोन लिहिल्याप्रा चौकसीने काम करून पाठवावें रसीदीवर तारीख घालण्याची जागा टाकिली आहे ज्या दिवसी ऐवज पदरी पडेल ते तारखेचा आंख रसीदीवर घालून देणे बहूतकरून रसीद तेथे देऊ नये एथें अमोलिकरामापासी देऊ ऐसें बोलावें अथवा सदरहु ऐवज पावल्याचें कबजपत्र आमचे नावें तुह्मी लेहून घटाले याजपासीं द्यावें की रुपये पावले रसीद अमोलिकराम यांस आपण द्यावी या प्रा पत्र तुह्मी द्यावें तें पत्र अमोलिकरामापासोन घेऊन रसीद एथें देऊ यास्तव तुह्मी तेथें रसीद न द्यावी इतक्यावर रसीदीचा फारच आग्रह पडल्यास द्यावी ऐवजाच्या हुंड्या घेऊन पाठवाव्या हुंडावन देण्यास घटाले दिकत करूं लागल्यास हुंडावनीचा भाव तेथें काय हें लेहून पाठवावें इकडून लेहूं त्याप्रा हुंड्या करून पाठवाव्या नगदी ऐवजासमागमे स्वार प्यादे जमा व बादरका चांगला दिल्ह्यास ऐवज रवाना करावा नाही तर पांच च्यार प्यादे देऊ लागल्यास ऐवज येण्याची निभावणी होणार नाही यास्तव नगदी ऐवज पाठवण्याचें न करावें हुंड्याची सोय करून रवानगी करणे नगदी ऐवज आणावयाची सोय नाही वाटेचे जखमेचा घोर याजकरितां हुंडावनीचा भाव सेंकडा काय आहे याचा शोध नारायणपेंठ वगैरे जागीं करून ल्याहावें एथून लेहुं त्याप्रा हुंड्या करून पाठवाव्या रा छ २३ जावल हे विनंति.