Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

तिमणी नाईक भागवत दलाल                                                      लेखांक ९५.                                                         १७१४ पौष वद्य ६.
अमरचितेकर यांजला जासुदाबराबर
पत्र र।। छ १९ जावल.

राजश्री तिमणा नाईक भागवत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणें विशेष महमहुसेनखान बाहादूर घटाले याजवर नवाबाचे सरकारातून तनखा पा मंगथल अमरचिता वडमान कडेचूर या च्यार माहालचे स्वराज्याचे मामलतीबाबत आह्माकडे ऐवजाचा फडच्या करून देण्याच्या जाल्या

१७२५०  सन ११९९ सालबाबत याचा वायदा खानमार याणी छ १२ जावल पौष–मासचा केला.

१७२५०  सन १२०१ बाा याचा वायदा छ १२ रमजानचे मुदतीचा खान मारनिले यांचा.
-----------
३४५००

चवतीस हजार पांचशे रुपयांच्या दोन तनखा याचे वायदे सदरी लिहिल्याप्रा खान मारनिले याणी करून करारनामा लेहून दिल्ही त्यापैकी छ १२ जमादिलावल पौष–मासचा वायदा गुजरून गेला सतरा हजार आडिचसें रुपये यावे याजकरितां एथें त्याजकडील वकील आमोलिकराम यांजला तगादा केला मारिनिलेनी करार केला कीं मंगथल एथें महमहुसेनखान आहेत त्यांस पत्र लेहून देतों तें आपले पत्रासुधा त्यांजकडे पाठऊन ऐवज घ्यावा याप्रा नवाब अजमुलउमरा बाहादूर यांजपासी करार करून अमोलिकराम याणी खानमार यांस पत्र लेहून दिल्हें तें व आह्मी आपलें पत्र पाठविले आहे दोन्ही पत्रें तुह्मी खानमार यांजकडे मंगथळास अथवा जेथे असतील तेथे नेऊन द्यावी आणि ऐवजाची निकड करून सवासतरा हजार रुपयांच्या हुंड्या हैदराबादचे साहुकारावर त्यांजकडून घेऊन जासुदासमागमे पत्राचे जाबासुधा रवाना कराव्या हुंड्याची सोय नसल्यास नगदी ऐवज त्यांजकडील स्वार व प्यादे समागमे देऊन एथें पोहचता करावा याप्रा खानमार यांचे पत्रीं अमोलिकराम यानी लिहिले आहे तरी तुह्मी पत्र पावताच त्यांजकडे जाऊन लिहिल्याप्रो ऐवजाचें काम करून लौकर पाठवावें वायदा गुजरून अधिक दिवस जाले यास्तव निकड करून ऐवजाच्या हुंड्या अथवा नगदी लिा प्रा रवाना करावा रा छ १९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.