Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला चिना-पटणकर लेखांक ९१. १७१४ पौष वद्य ४.
याचे पत्राची उत्तरे दोन र।।
छ १७ जावल.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण असीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी छ १७ माहे राखरचें पत्र पा ते पाऊन सविस्तर मा अवगत जाला श्रीमंतास अर्जी व अखबार बेगोंद पा आहे हे पाहून पुढे रवाना करावी आजपावेतो सात पत्रें पाठविली असे परंतु जवाब न आला याजमुळें पुढे लिहिण्यास अनमान व पुढें नवल विशेष लिहिण्यास आंगेज पुरत नाही इत्यादिक मार लिहिला तो सर्व समजला ऐसियास पत्रें पावलीं मार समजला एथून जाबहि रवाना जाले आहेत पावले असतील याउपरि पत्रें रवाना करण्याविसी अलस न करावा र।। छ १७ जावल बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद भोंसले यांजकडील रामचंद्रपंत यांचे पत्र तुह्मी पाठविलें त्याचा जाब त्याणी दिल्हा तो पाठविला असे हे आसीर्वाद.