मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र सदासीवराव महिपत कमाविंसदार                                           लेखांक ५४.                                              १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.
पा इंदापूर गु।। कोन्हेर बाबुराव.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदासीवराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष राघोजी सिंदे कसबे इंदापूर एथे राहतो याचे मळ्यांत भिकाजी अभंग माळी चोरी करावयास गेला सिंदे मार याचा भाऊ रखवालीस होता त्याची दगड लागला त्याजवर कांहीं दिवस जाल्यानंतर अभंग मार वारला त्याचे भाउबंद याणी गैरवाका समजाविले दगड लागल्यामुळें मेल्याचे निमित्य ठेऊन सिंदा मार याचे घरची चीजवस्त गुरें नेली व मुलें माणसे कैदेत ठेविली आहेत ह्मणोन कळले त्यावरून लिो असे त्यास अभंग मार धोंडा लागोन मेला ऐसेहि नाही गैरवाका समजाविल्यावरून चीजवस्त व गुरें नेली ती याचे यास माघारी देवावी व मुलेमाणसे कैदेतून सोडावी येविषीचा बोभाट न ये तें करावें रा छ २८ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries