Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र राजे व्यंकटपा नाईक यांस लेखांक ४९. १७१४ मार्गशीर्ष वद्य ९.
मीरअलम बाहादूर याणी
मागितले त्याजवरून दिल्ह
छ २३ राखर
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बेहरी बहादूर गोसावी यांस-
७ सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे मरचेडी पा रायचूर जागीर मीरअलम बाहादूर एथील बैल सुमार ३७ सदतीस आरकेरे एथील नायब याणी नेऊन मौजे मारचे रयतेपासोन च्यारशे रुपये नगद घेतले ते फिरोन देवण्याविषईं पेशजी आपल्यास पत्र पाठविलें असतां त्याचा फडच्या न होतां आणिक मौजे मार पैकी सवासे बैल व सत्तर बकरी आरकेरेकरानी नेली येविषीचा बोभाट आला त्या वरून हली लिो असे त्यास येविषीचा बोभाट एथे यावा हे नीट नाहीं याउपरि गुरे व नगदी ऐवज यांजकडील गांवचा तेथील अमील यांजकडे पावता करून रसीद घेऊन पाठवावयाचे करावे येविषीं वारंवार लिहिणे न पडता मवेसी व नगदी परतोन देण्याविषई आरकेरे एथील आमीलास निक्ष्णून ताकीद होऊन बंदोबस्त व्हावा मीर साहेब यांजकडील गांवची मवेसी व नगदी ऐवज नेल्याचा बोभाट हुजुरांत आल्यावरून अह्मास सांगितलें कीं तुह्मी पत्र पाठऊन मवेसी व नगदी माघारी देवावी त्यावरून सांप्रत लिो असे तरी मवेसी जराबजरा व नगदी ऐवज मीर साहेबाकडील आमिलाकडे पावता होऊन त्यांची रसीद घेऊन या पत्रासमागमे जरूर पाठवावी रा छ २३ राखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.