Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रघुनाथ गोविंद कादार पा कलबर्गे लेखांक ५५. १७१४ मार्गशीर्ष वद्य ३०.
यांस पत्र शर्फुल उमरा बाहादुर याचे कर्ज
च्यार हजार रुपये शाह केसूदराज पीर
जादे दंडवतीकर यांजकडे येणे येविसी
रा छ २८ रााखर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष नवाब शर्फु उलउमरा बाहादूर यांजकडोन आमचे च्यार हजार ४००० रुपये येणे त्याचा तगादा यांस केला त्यास याणी सांगितले की आमचे च्यार हजार रुपये शाहासाहेब शाहगेसुदराज यांजकडे ठेविली बा कर्ज वाजवी येणे आहेत ते कमाविसदारास लेहून तगादा करून आणऊन घ्यावे त्याजवरून हे पत्र तुह्मास लिहिलें असें की च्यार हजार रुपयांचा तगादा तुह्मी शाहासाहेब यांस करून सदरहू च्यार हजार रुपये मौजे दंडवती व मौजे भागेवाडी एथील ऐवजी वसूल करून पाठवावें येविसीं शाहासाहेब उजुर करतील तरी त्यास सांगावें की तुह्मी आपले तर्फेनें कोणास नवाब मवसूद याजपाशीं पा जाबसाल करून घ्यावा ऐवज वसुलास कोन्हाची मुर्वत न धरावी येविसीं नवाब मवसूद याणी आपले पत्रं शाहासाहेब यांस लेहून जुरत हरकारा पाठविला आहे त्यात शाहाजीस निक्षून लिहिले आहे घराउ काम लिहिल्याप्रो जरूर करावे उत्तर पाठवावें र॥ छ २८ रााखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.