मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

र।। आनंदराव मोरेश्वर यांचे                                                         लेखांक ५६.                                                                   १७१४ पौष शुद्ध १.
पत्राचा जाब,

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पाऊन मजकूर समजला राजश्री गोविंदरावआणी इंदापुरास आले त्यांची भेट जाली आह्मी आपले वर्तमान सविस्तर त्यांस सांगितलें त्याणी अजमुलउमरा बाहादूर व राजे नेमवंत यांस पत्रें लिहिली आहेत त्यास ही पत्रें लिहिली आहेत त्यास ही पत्रें त्यास पाऊन आमचा साहित्य उपराळा व्हावा नाही तरी तनखादार आबरू राहू देणार नाहींत इत्यादिक मार लिहिला होता तो सर्व समजला ऐसियास पत्रें पावती जाली एथील ध्यान रीत हे सर्व तुह्मास माहितच आहे ल्याहावे असा अर्थ नाहीं राजश्री गोविंदराव यांचे पत्राची उतरें पा आहेत त्याजवरून कळेल र।। छ २९ राखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries