Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र बापु सिवाजी यांस लेखांक ५७. १७१४ पौष शुद्ध ३.
हरबाजी नाईक वानवले यांनीं मागितलें
सा दिल्हे जाफराबाद प्रकर्णी
छ १ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापुजीपंत स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष पा जाफराबाद एथील वर्तमान तुह्माकडील पत्र येऊन आलीकडे कांहीच कळत नाही त्यास सविस्तर लेहून पाठवावे पा मारचा वसूल गांवगना तुह्मापाशी आजपर्यंत जमा जाला आहे तो पत्र पावताच हैदराबाद एथे पाठऊन द्यावा ऐवजाचे प्रयोजन एथे जाणून लिो असे तरी झाडून वसूल जमा असेल तो लवकर पाठवावा यास दिवसगत लागो नये नाईकाचे हिशासुद्धा ऐवज झाडून वसूल जाला असेल व होईल तो एथे पाठवावा फर्मास नाईकाचे हिशाची त्याजकडे देत जाणे धारण सात आठ रुपये धारण पल्ला असे असल्यास पांच हजार सात हजारपर्यंत समाईक घेऊन गला खरीदी करून ठेवावा पुढे फरोख्त करावयासी नीट पडेल याचा आलस न करणे ॥ छ १ जावल सलास तिसईन बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.