मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

जिवाजी बाबूराव निलंगेकर                                                         लेखांक २३३.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ११.
यांस बापू रामदासी यानी
पत्र मागितलें सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जिवाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पोाा गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष हरिभक्तिपरायण राजश्री बापूजीबाबा रामदास मठ कसबे निलंगे यांस मठाचे खर्चास स्वराज्याकडून मौजे लांबोटे पा मार हा गांव दरोबस्त आहे त्यास ईशा सन ११९७ ता सन ११९९ पावेतों तीन साला बाकी मौजेमाराकडे राहिलीं त्याचे बजीनस रोखे-पत्र असतां फडच्या होत नाहीं ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे तरी रामदासीबावाकडील बाकी राहिली असेल ते रोख्याप्रा मौजेमारचे गांवकरी यास ताकीद करून वाजबीप्रा फडशा रुबरू करून देवावा पामारी गांवगना एक रुपया सालाबाद व दिपाराधनेस तूप पावसेर रोज चालत आलें असतां अलीकडे तुमचे अमलापासोन दिकत ह्मणोन समजलें त्यास चालत आल्याप्रा चालवावें बोभाट येऊ न द्यावा रामाजी मल्हार यांचे अमलांत राजश्री अपाजी नाईक पंढरी यानी यांचे मोकाशाऐवजी पेशजीचें आपलें देणे ह्मणोन वीस रुो वजा करून घेतले त्याचा दस्तऐवज बजीनस आहे त्यास ते रुपये यांचे याजकडे देवावे सदरहू जाबसाल वाजबीमा विल्हे लावावे बोभाट येऊ न द्यावी रा छ १० सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries