Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
कोन्हेरराव हरी व तिमाराव हरीचे लेखांक १७८. १७१५ चैत्र वद्य ३.
पत्राचें उत्तर.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कोन्हेरराव व तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें सरदारुलमुलुकबाहादूर यांजकडोन स्वराज्याचे मामलतीबा ऐवज येणे त्यापो पहिल्या हत्याऐवजी तुह्माकडोन साडेबाहत्तर हजार रुो येणे त्यापो तुह्मी हुंड्या पेशजी पाठविल्या त्याच्या रसीदा इकडून रवाना केल्याच आहेत बाकी ऐवज येणे तो व अलीकडे दोन हप्ते भरले त्याबाबत मिळोन एकंदर ऐवजाचा भरणा भारी तुह्माकडून येणे असतां अद्याप ऐवज येत नाही हे काय याउपरि पहिले हत्यापो बाकी व दोन हप्ते दरोबस्त याप्रा ऐवजाची रवानगी सत्वर करावी दिवसगत लागो नये राजश्री विसाजी प्रल्हाद निा सरदेशमुख यांजकडे खंदार व सारबाड एथील मोकासदाराकडे गांव आहेत तेथील वसूल त्यांजकडे पडला त्याच्या रसीदा देतों ह्मणतात आज्ञा जाली तर तीस हजारपावेतो रसीदा घेऊन पाठवितों ह्मणून लिा त्यास सन १२०१ पावेतो एकंदर स्वराज्याचा ऐवज एथें घेण्याचा ठरला त्यापक्षी परभारा गांवाचे वसुलाच्या रसीदा घेऊन पाठवावयाचें कारण नाही याजकरिता रसीदा घेऊन पाठऊं नयेत करारबमोजीब नगदी ऐवज पहिले हप्ते-याची बाकी व अलीकडील दोन हप्त्याबाबत याप्रा झाडून सत्वर पाठवावा कमाविसी जे गांव त्याऐवजी मजुरी देणे ऐसें तुह्मी लिहिणे आह्मी रुकार देणे हे रीतीची गोष्ट नाही याजकरितां कमाविसी गांवचा ऐवज तुह्मी परभारा घ्यावा इकडील ऐवज कराराबमोजीब लौकर पाठवावयास आळसाखालें टाकू नये रा छ १७ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.