Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजे जोधसिंग खंदारकर यांचे लेखांक १७७. १७१५ चैत्र वद्य ३.
पत्राचें उत्तर.
राजश्री राजे जोधसिंगबहादूर गोसावि यास-
७ अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावे विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें ह्मसें मुधोळ वगैरे तालुक्याचें काम नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून करून घेण्याविषई तपसिलें मार लिहिला व राजश्री हरिपंत तात्या यांचे पत्र पाा तें पावोन सविस्तर समजलें त्यास सांप्रत सैफुलमुलुकबाहादूर यांचा काल जाला गोष्ट अनुचित जाली याजकरितां नवाब-अजमुलउमराबाहादूर आपले चित्तांत उदासीन आहेत बंदगानअली यांची स्वारी बेदरास जाण्याचीहि गडबड आहे इतक्यावर प्रसंग पाहून नवाब-मवसूफ यांसी बोलण्यांत येईल त्याप्रा लिहिण्यांत येईल ता राजश्री सुभराव लिहितील त्यावरून कळेल आपले कार्यास इकडून दुसरा प्रकार व अनमान व्हावयाचा नाही ता लिहिणे कारण नाही निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें रा छ १७ साबान बहुत काय लिा लोभ असो दीजे हे विनंति.