Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजश्री आबाजी बलाळ फडके                                                     लेखांक १०१.                                                         १७१४ पौष वद्य १३.
अवरादकर यांचे पत्राचे उत्तर त्यांचे
माणसा बार रा छ २६ जावल.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराघ कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित आसिलें पाहिजे विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पाऊन मार समजला मौजे अवरादकर मुलाणा व मौजे किटे पा कल्याण एथील येलम याणी जमयेत गोळा करून किट्यात जाऊन तेथील मखदूम पाटील यास जिवे मारून अवरादेस आले यांचे वर्तमान आह्मास ठाऊक नव्हते समजल्यानंतर मुलाण्यास धरावयास पा तो मुलाणा पळोन गेली त्यांचे घरांत येलम व आणिक तीन आसाम्या सांपडल्या ते आणून कैद केलें याचे वर्तमान मीरसादतअलीखान अमील कल्याणकर यांस समजल्यानंतर त्याणी आसाम्या मागविल्या प्रथम आह्मी टाळा दिल्हा दुसरी वेळा पत्र पा तेव्हां येलमास त्याचे हाती दिल्हे हालीं तीन आसाम्या आणखी मागतात नाही तरी गांवावर पेठेवर हांगामा करणार त्यास येविसी काय आज्ञा ह्मणोन लिहिलें ऐसियास आसाम्या त्यांचे हाती न द्याव्या हे गोष्ट मार्गाची परंतु तुह्मी जे पत्र खानमार यांस लिहिलें त्यांत तुमचा दस्तैवज गुंतला आहे की आसाम्या आह्मापासी आहेत जे वेळेस मागाल ते समईं पाठऊन देऊ ते पत्र खानमार याणी नवाब ममताजुलउमराबाहादूर यांजपासी पा त्याणी आह्मास पाहावयास पा त्यात दस्तैवज जिमा जाल्या प्रो आहे याउपरि आसाम्या न देण्याविसी बळ करावें तरी मौजे मारचे आसपास अगदी पागावाले व कल्याणकर याचा उपद्रव गांवास जाल्यानंतर गांवची व पेठेची खराबी होईल याजकरितां तुह्मास पत्र लेहून दिल्हे आहे व नवाब मवसूफ यांचे थोरले मोहरेचा कौल गावास व बेपारी वगैरेस व एक पत्र खानमार यांचे नावें तुमचे व गावचे व पेठेचे साहित्याविसी घेऊन पा आहेत त्यास तीन आसाम्या खानास देऊन तुमचे व आमचे पत्र व आसाम्या पावल्याची रसीद घ्यावी व मुलाण्याचा शोध करून धरून कैद करावे त्याची रांडापोरे गावात असतील त्यास कैदेत ठेवावें असे बखेडेखोर लोक असतील त्यास वरचेवर जपून असावें गांवचा बखेडा जाल्यास राजश्री तात्याचा शब्द लागेल ते न करावें वरचेवर तेथील वर्तमान लिहित जावें रा छ २६ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.