Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
महमद अनसान विज्यापुरी याचे लेखांक १०२. १७१४ पौष वद्य १३.
वकील यशवंतराव दत्तात्रय यांचे
मागीतल्यावरून दोन पत्रे लिहा त्यास
बळवंतराव हरी धारासीवकर यांचे
पत्र खाजगीच जुजांत लिा आहे व
निंबाजी नाईक निंबाळकर याचे पत्र
रा छ २६ जावल.
राजश्री निंबाजी नाईक निंबाळकर गोसावि यांसी-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असले पाहिजे विशेष महमदअनसान बिज्यापुरी जागीरदार देहात पा कांठी व पारडी यांची अर्जी नवाब बंदगानअली यांस आली कीं निंबाजी नाईक निंबाळकर याणी जमाव करून मौजे वडगाव पा कांठी आमचे जागिरीपैकी मारून ताख्तताराज करून चीजवस्त नेली व ठाणे घेतले आहे त्यास येविसीचा बंदोबस्त जाला पा ह्मणोन त्याजवरून बंदगानअली यांचे फर्मावण्यात की तुह्मीं पत्र लेहून मौजे मारचे ठावे व चीजवस्त काय नेली आहे ते देवावी नाही तर याचा तदारुक केला जाईल त्याजवरून हे पत्र लिा असें की मौजे मारची चीजबस्त वगैरे काय नेली असेल ते व ठाणे माघारें द्यावें उगाच खटला करणे ठीक नाही अथवा कांही जाबसाल असल्यास लेहून पाठवावें त्याप्रो एथें बोलून बंदोबस्त करून द्यावयास येईल रा छ २६ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.