Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ३१३
१७२२ आषाढवा।। ८ बाळबोध

श्रीलक्ष्मीनृसिहप्रसन्
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राम्हण क्षेत्र
करहाढ याशी

नागेशभट्ट विन्न बाजीभट ढवळीकर सा।। विनती उपरि ऐशी जे अह्मी नरशीपुरास गेलो होतो जाऊन बाबा श्रीधर यास वाळीत असता जाऊन त्याचे घरी भोजन केले ह्मणू सर्काचे रोखे आमच्या शेता वर जाले अहेत याज मुळे अह्मी तुह्मा पाशी अलो याज वरून अपण विच्यारिले जे तुह्मी जावयास कारण काय व तेथे जाउन काय करून अला हे सागावे त्यास बापूच्यार्य बिन रघूनाथाच्यार्य घळसाशी हे अपल्या बहिणीस हिवाचे औषध घेऊन जात होते व अह्मी देवास जात होतो त्यास बाबा श्रीधर यास वाळीत अहे दुस-या घरी राहवू ऐस बापूच्यार्य यास बोलिलो त्यास बापूने उत्तर केले जे अह्मी दोन चार वेळा बाबा श्रीधर याचे घरी जाऊन भोजन करून अक्षत लाऊन अलो परतु अह्मास कोणी विचारिले नाही त्याज वरून बापूच्या सोबतीने अह्मी जाऊन त्याचे घरी भोजन केल्या नतर देवदर्शनास जावे तो गावात ब्राह्मणानी अह्मी भोजन केल्या नतर देवदर्शनास जावे तो गावात ब्राह्मणानी अह्मी भोजन केले ह्मणून गजबज केली याज मुळे देवदर्शन जाले नाही इत पर त्याचे सहा घरात जाणार नाही साप्रत तुह्मी जे सागाल ते ऐकू यास अतर होणार नाही हा कागद लेहून दिला सत्य मिती शके १७२२ रौद्रनामसवत्सरे अषाढवद्य ८ हस्ताक्षर ॐ