Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३१०
१७२२ वैशाखवा॥ ३०
श्री
यादी बाबा श्रीधर रगाचार्य जोशी नरसीपूरकर या उभयताचा वृद्धिक्षया मुळे खटला पडला सबब क्षेत्रकराड येथे आले उभयताचे मनास आणिता बाबा श्रीधर याने सुतक धरले नाही सबब बहिष्कारपत्रे पाठविली त्याज वर गुप्त शुद्धपत्रे नेहली ह्मणून पुन्हा क्षेत्रस्थाची व सरकारची बहिस्कारपत्रे सादर गावगन्ना जाहली याज मुळे बाबा श्रीधर यानी मिरजेस जाऊन मुलीचे लग्न केले तेथे आमचे कराडकर क्षेत्रस्थ असाम्या जाऊन लग्न करून आले व नतर सरकारात समजलेंं
चौतळकराचे घरी मुज वै॥शु॥ १० स जाहली शु॥ १२ स ब्राह्मण जेवावयास सागितले ते मिरजेस गेले व आणखी हि सागितले त्याज वरून सरकारचा कारकून भगवत जिवाजी अवकरे येऊन त्याने मिरजेस गेलेले ब्राह्मण आ॥ १४ वोढून काढिले मग वसतपूजेस व भोजनास कोणी सागनातसे जाहले वाळीत चौदा असाम्यास पडले ते समई गर्गशा सरकारात पडला त्यानी निक्षुने सागितले की मिरजेस जाण्याचे कारण काय समस्ताचे बहिस्कारपत्र व सरकारची पत्रे ऐसे असता सुतकीयाचे घरी लग्नात जाऊन भोजन केले सबब प्रायश्चित्त घेतल्या वाचून पक्तीस अन्नोदकव्यवहार करू नये ऐसे ठरल्या वर सदरहू मिरजेस चौदा असाम्या गेली होती त्यानी उपोषण वै॥शु।। १२ पासून वो गोविंदजोशी वाडानजीकसरकार येथे प्रारभ केला उपोषणास त्यास तीन उपोषणे जाहली मग श्रीमत मातुश्री काशीबाई यानी वो। तात्या गिजरे व चिमण जोशी व रामभट गोवारकर यास पुसिले जे क्षेत्रात कलह पडला आहे हा तोडून टाकावा त्यास मिरजेस आ। १४ गेली त्यानी श्रीसगमी स्नान करून पचगव्य घेऊन तुह्मी समस्त व ते एकभावे असावे कलह करू नये त्याज वरून चौदा आ॥ १४ त्यास धणी रामभट गोवरेकर व क्षेत्रस्थ दोनशे चौदा आ। यास धणी तात्या गिजरे येणे प्रमाणे याद ठरवावी ह्मणोन राजश्री बापूरुद्र व विष्णुपत व धोडोपत व मोरो अनत भागवत यास सागितले त्याज वरून कचेरीस येऊन याद ठरली ती धोडोपत यानी पाहून विवाद बोलू लागले की रगभट यास बहिष्कार असावा बाबा श्रीधर यास आहे ह्मणोन त्यास असावा त्याज वरून श्रीमत बाई याणी आज्ञा केली जे नरसीपूरकर समस्त ब्राह्मण ज्यास पक्तीस घेतील त्यास तुह्मी घ्यावे येणे प्रमाणे मान्य सर्वत्राचे विचारे याद करून मान्यता घालोन याद विष्णुपती ठेविली आहे मग सरकारचा कारकून त्रिबक मलेगिरी यास समागमे देऊन श्रीचे देवालये पचगव्य वै।। वा ॥ ३० चे दिवशी दिल्हे पचगव्य करून वो। हरभटबाबा यानी द्यावे या प्रमाणे ठरोन सदरहू असामी यानी पचगव्ये घेतली ती याद त्रिबकपत याज पाशी आहे मिति शके १७२२ वै॥वा॥ ३० पचगव्य प्राशन के सर्वत्रानी बाबा श्रीधर सुतकी असता याचे लग्नास मिरजेस चौदा असाम्या गेल्या सबब पचगव्य घेणे प्राप्त