Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३११
१७२२ ज्येष्ठ वा॥ ३

श्री
नकल
वो। राजश्री बालंभट बिन नरसिंहभट व बाबाभट बिन श्रीधरभट अध्यापक प्रभृति भाऊ साहा जोतिषी क्षेत्रनरसिंपूर यांसि

प्रति बाळशास्त्री विनंति उपरि वो। राजश्री शामभट बिन दादभट अध्यापक जोतिषी क्षेत्रनरसिपूर यानी विदित केले की नरसिपूर येथील जोतिषाचा व अग्रहरसमधे बाळंभट व बाबाभट याचा व आमचा पेशजी कजिया लागोन विषय जप्त होऊन मनसुबी सरकारात पडली त्याचा फडशा जाहला नाही परतु परस्परे वृधिक्षय धरीत आहो सालगु॥ रगभट बिन दादभट याची स्त्री प्रसूत होऊन मृत्यु पावली तिचा वृधिक्षय धरिला नाही सबब हे वर्तमान उभयतानी क्षेत्रकराड येथील ब्राह्मणास सागितले ते त्यानी समजोन घेऊन बाळभट व बाबाभट प्रभृति भाऊ साहा यास बहिष्कार घातला असता कोठे कोठे ब्राह्मणास अन्नव्यवहाप करितात त्यास आणोन मनसुबीचा फडशा करावा ह्मणोन त्याज वरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे तरी कराडकर याणी तुह्मास बहिष्कार घातला आहे त्याप्रमाणे बहिष्कृत राहून मनसुबीस पुण्यास येणे या कामास माहादजी कोडे व सिवाजी जगताप असामी दोन पाठविले आहेत यास मसाला रुपये १०० शभर आदा करून निघोन येणे रवाना छ १६ मोहरम: सु।। इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति

छ २१ मोहरम ज्येष्ठवा ८