Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०८
१७२२ वैशाख शुद्ध ३
श्री
यदी शके १७२२ रौद्रनामसवछरे वैशाख शु।। ३ रविवार तदिनी बाबा श्रीधर वगैरे साहा असामी यास बहिष्कार पूर्वी असता बाबा श्रीधर याणी चोरून मिरजेत लग्न केले त्या लग्नास मिरजेस ब्राह्मण कराडकर व नरसिपूर गेले नावनिसीवार
१ नागेशभट गिजरे १ वासुदेवाचार्य घळसासी
१ व्यकणभट अयाचित १ गोपाळाचार्य घळसासी
१ समुद्रभट-बनवडीकर १ व्यकाजी बापू घळसासी
१ नागेशभट ढवळीकर १ गोविंदभट ढवळीकर
१ सिदभट ढवळीकर १ रामभट कडू बनवडीकर
१ व्यकणभट आवकीर १ काशिनाथ अयाचित
१ शामावैद्य १ रामभट विदार
२ नरसिपूरकर
१ रगाच्यार्य घळसासी
१ आपाजी गोविद घळसासी
येणे प्रमाणे असामी याचे बि-हाड त्रिबकराव सुभेदार कसबे तेरदाल शरीरसबध तिमण्णा नाईक कपली याच्या पुत्राची मुज सोडली नवती त्यास सूर्योदया पूर्वी समावर्तन करून नतर दोन घटिकाने देवकप्रतिष्ठा केली दोन प्रहरा नतर लागली च लग्न केले तिथी ३ रविवार