Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ३०६
१७२१ । १७२२

श्री
यादी नरसीपूरकर याचे

१ प्रथम बापाजी श्रीधर व + + + उभयता आले ते बापूचार्य घळसासी यानी सखाराम दी॥ ढवलीकराचे घरास घेऊन आले ते समयी रामभट विदार व तमणजोशी बैसलो होतो त्यानी वर्तमान सागितले की आमचे बाप भाऊ सुतक धरितात त्यास आमचे ह्यणे

१. दुसरे दिवशी आह्मा कडे आले की सात जण अर्धेलीचे भाऊबद यास पत्र पा। आणावे ह्मणून बापू घलसासी यानी सागितले त्या वरून पत्र सदर्हूचे नावचे लि॥

१ बाबाचार्य घलसासी याचे समाचारास गेलो होतो ते समयी रामाजी मुकुद आले त्यानी सागितले की बाबा श्रीधर सुतकी आहेत एक पक्ती बसणार नाही याचे प्रमाण काय लेहून देणे उभयतानी लिहून दिल्हे त्याज वर रामाचार्य बोलिले बाबा श्रीधर यास तुह्मी अशौची आमचे घरास येऊ नये त्या समयी तात्या जोशी व बाळभट गिजरे व वासुदेवाचार्य विदार असामी दोन होत्या या प्रमाणे बाबाचार्य हि ह्यणाले राहू नये

१ बाबाचे घरी बि-हाड होते ते समयी त्या समस्तानी सागून पा। जे नरसीपूरकर यास जेवायास न बोलावणे त्याज वरून त्याणी सागितले जे वेघळे जेवतात

१ व्यकटाचार्य टोणपे याचे घरी समाराधना जाहली ते समयी टोणपे घलसासी यानी उभयतास पक्तीतून काढिले

१ समस्त वादे मिळाले पचाइतीस प्रारभ जाहला ते समयी बाळाजी शामजी आणविला आणि वशावळ खोटी ह्मणून लि॥ दिल्हे आहे त्या वरून आमचे पचाईतपैकी काही जण मिळोन त्यास पत्र करून दिल्हे ह्मणोन खटला पडला

समस्त पैकी पचाइतीस हजर

१ बाजी भिकाजी                  १ माहादेव जोशी
१ गोपाल दी॥                      १ अण्णा दीक्षित
१ गोपाल दीक्षित उब्राणे         १ रामभट विदार
१ नागोबा अण्णा                   १ सिनापा घलसासी
१ नरसोबा नाना                    १ नागोबा ढवळीकर
१ बालभट गिजरे                   १ तात्या जोशी
१ चिमणा जोशी                    १ रामचार्ये घळसासी
१ शकरभट गिजरे