Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३१२
१७२२ आषाढ वा। ८ बाळबोध
श्री
वेदशास्त्रसंपन राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रक-हाड यासि
बापूचार्ये बिन रघुनाथाचार्ये घळसासी क्षेत्रमजकुर विनती ऐसि जे अह्मी नरसिपुरास गेलो होतो जाउन बाबा श्रीधर यास वाळित असता जाउन त्याचे घरि भोजन केले मणुन सरकारचे रोखे अमचे शेता वर जाहले अहेत याज मुळे अह्मी तुम्हा पासि अलो याज वरून अपण विचारिले जे तुम्ही जावयास कारण काय व तेथे जाउन काय करून अला हे सागावे त्यास अम्ही अपल्या बहिणीस औषध घेउन जात होतो व नागेशभट बिंन बाजीभट ढवलीकर देवास जात होते त्यास हे बोलिले कि बाबा श्रीधर यास वाळित अहे दुसरे घरि राहिल्यास अम्ही बोलिलो जे त्याचे घरिं अम्ही येक दोन वेळा जाउन भोजन करुन अक्षद लाउन अलो परतु अम्हास कोणि विचारिले नाही याज वरुन अम्ही व नागेशभट मिळोन बाबा श्रीधर याचे घरि जाउन भोजन केले हे वर्तमान गावात ब्राम्हणास समजले याज वरून अम्हास धरून बसविले आणि रेट-यास अणिले रेटरेकर यानी त्यास माघार लाउन दिले अम्हास कराडास लाउन दिल्हे हे वर्तमान खर साप्रत तुम्ही जे सागाल ते मान्य करुन पुढे त्याचे साहा घरास अम्ही जाणार नाही व ते येथ अले तर स्थळ देणार नाही अणि अमचे मुली त्याचे घरि अहेत त्या हि त्याचि निस्कृति होय तो पर्यत अणार नाही हे पत्र लिहिले सत्य मिती शके १७२२ अषाढ वद्य ८ हस्ताक्षर