Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ३०३
१७२१ सुमार
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथ भट मिरगुडे ज्योतिषी सोनकिरे या प्रति समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक नमस्कार विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे विशेष बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा व रगभट बिन दादभट या उभयताचा वृद्धिक्षयाचा खटला होऊन बाबा श्रीधर क्षेत्रास आले क्षेत्रस्थानी बाबा श्रीधर यास विचारिले जे रगभट याचे घरची वृद्धिक्षय तुह्मी वडिला पासून धरीत आला असता हाली का धरीत नाही याचे कारण काय त्यास बाबा श्रीधराने उत्तर केले जे बाळा शामजी याज पाशी वशावळीची याद होती ती आह्मास दिल्ही त्या वरून क्षयवृद्धि करीत नाही त्यास वशावळीची समस्त क्षेत्रस्थानी न धरिता गावा मध्ये व्यवहार करू लागले या करिता पचाईतमुखे व गोतमुखे उभयताचा निवाडा होय तो पर्यत बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा यासि अपक्त केले असे त्यास पूर्वी बहिष्कारपत्रे क्षेत्रस्थाची व श्रीमत पतप्रतिनिधीची गेली आहेत आपणास कळावे या उपरी आपण व आपले ग्रामस्त सुद्धा बाबा श्रीधर व त्याचे भाऊ असामी सहा याचे पक्तीस अन्नोदकव्यवहार करू नये