Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

श्रीमतकरहाटकक्षेत्रस्थसमस्तब्राह्मणकृतानेकनमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद उपरि वेदमूर्त्ति रगभट बिन्न दादभट्ट ज्योतिषी नर्शिपूरकर याची स्त्री प्रसूत होऊन मृत्यु पावली तीचे वृत्धिक्षयाशौच न धरिता वो। बाबा श्रीधर ज्योतिषी नर्शिपूरकर क्षेत्रास येऊन विदित केले जे आपले निमेचे भाउ बाळाजी मुकुद प्रभृति यानी रगभट्टाचे स्त्रीचे आशौच धरिले त्यास क्षेत्रास बोलाऊन विचारावे त्याजवरून बाळाजी मुकुद प्रभृति आणविले त्याची चौकशी करीता बाळाजी शामजी यानी बाळाजी श्रीधर या पाशी पेशजी आदिमाळिकेची याद दिल्ही होती ती बाळाजी शामजी यानी खोटी ह्मणोन आपले भाउ बाळाजी मुकुद प्रभृतिच्या साक्षी घालून पत्र लेहून दिल्हे त्याज वरून बाबा श्रीधरास विचारिले जे तुह्मी रगभट्ट याचे स्त्रीचे आशौच न धरीले त्याचे कारण काय त्याचे उत्तर न करिता क्षेत्राहून निघोन गेले सबब बाबा श्रीधर याचे भाउ साहा असामी बितपशील

१ बाळभट्ट बिन्न नर्शिभट्ट                १ बजभट्ट बिन्न मनभट्ट
१ शामभट्ट बिन्न पाडुरगभट्ट            १ बाजीभट्ट बिन्न वासुदेवभट्ट
१ अपाभट्ट बिन्न जनार्दनभट्ट            १ बाबा व बाप्पा बिन्न श्रीधरभट्ट

या साहा असामी यानी आशौच धरिले नाही त्यास बहिष्कारपत्र पू्र्वी पाठविले आहे ते पहाता सर्वार्थ ध्यानात येयील या नतर बाबा श्रीधर यानी मिरजेचे पत्र आणोन क्षेत्रस्थास शुत्धपत्र मागु लागले त्यास शुत्धपत्र न द्यावयाचे कारण बाबा श्रीधर याचे वडील व हेहि खुद आजपर्यत रगभट्टाचे घरिचे आशौच धरीत आले हल्लि बाबा श्रीधर याचे घरभाउ गोविंदभट्ट अरे व अनतभट्ट अरे व निमेचे भाउ बाळाजी शामजी व बाळाजी मुकुद प्रभृति यानी आशौच धरिले असता बाबा श्रीधर घरभाउ असामी सहा यानी आशौच धरिले नाही ह्मणोन शुत्धपत्र दिल्हे नाही त्याज वरून बाबा श्रीधर श्रीक्षेत्रपालाचे देवालयी उपोषण करू लागले ते समयी त्याचे निमेचे भाउ रामाजी मुकुद व घरभाउ गोविदभट्ट अरे समुदायसुत्धा येऊन बाबा श्रीधरास विचारिले जे मिरजे मध्ये समस्त ब्राह्मण यानी रगभट्ट याचे घरचे आशौच धरावे कि न धरावे हा ठराव करून पत्र आणिले ते अह्मास न समजाविता क्षेत्रा मध्ये उपोषणे करावयाचे कारण काय मिरजेत अह्मि विद्यमानी नसता जो ठराव जाहला तो समस्त क्षेत्रस्थाचे व नर्शिपुरकर समस्त ब्राह्मण याचे विद्यमाने अह्मास समजाऊन द्यावा ऐसे ह्मणत असता बाबा श्रीधर यानी त्याचे उत्तर न करीता त्यासी मारामार करून घरा मध्ये येका दोघा जणा पासून शुत्धपत्र गुप्त घेऊन गेले आणि नर्शिपुरी व भोवरगावी एकपक्ति अन्नोदकव्यवहार करावयास प्रवृत्त जाहले ह्मणोन ऐकितो त्याज वरून हे पत्र तुह्मास सादर केले असे तर बाबा श्रीधर घरभाउ असामी साहा यानी आशौच न धरिले त्याची निष्कृती क्षेत्रा मध्ये नर्शिपुरकर समस्त ब्राह्मण याचे विद्यमाने होय तोपर्यत बहिष्कृत असे