Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३०२
१७२१ सुमार बाळबोध

त्यास विचारिले जे तुह्मी मिरजेस जाऊन सिद्धात काय केला तो अह्मास क्षेत्रस्थाचे विद्यमाने समजाऊन द्यावा अह्मी हि क्षेत्रस्थ सागतील त्या प्रा। करू ऐसे ह्मणत अस्ता सर्वास न समजता एकदोघा पासोन घरात शुद्धपत्र घेऊन समस्तास न विचारता वाद्याशी मारामारी करून परभारा पळोन गेले नतर अरे प्रभृति सरकारात जाऊन अपले वृत्त निवेदन करून ते शुद्धपत्र दाखवून भोवरगावी वगैरे कोठे एक पक्ति अन्नोदकव्यवहार करावा ह्मणोन खटला करितात ह्मणून ऐकतो त्याज वरून हे पत्र लिहिले असे तरि बाबा श्रीधर याणी घरा मध्ये एका दोघा पासोन शुद्धपत्र नेले ते खोटे तरि त्याशी अन्नोदकव्यवहार न कर्णे त्यास योग्य चतुवर्ग बधु नीमेचे व घरबधु येकत्र होउन ग्रामस्थाचे विद्यमाने वशावळ खरी करून मग आशौच सोडावे हे काही मिरजकर यानी न करिता पत्रे करून दिल्ली ते सर्वास मान्य होत नाही या स्तव चौघे बधु येकचित्ते करून परस्पेरे वशावळ समजोन घेत तावत्काल पर्यत हे साहा जणा सर्वकर्मबहिष्कृत असेत ज्या ग्रामी ज्यास भेटतील त्याणी साहा आसामीच्या घरच्यास स्पर्श आदिकरून कोणताही व्यवहार करू नये साहा घरचे शरीरसबधाचे अगत्यवादास्तव याशी चोरून व्यवहार केल्यास त्यास क्षेत्राहून बहिष्कार पडेल हे स्पष्ट समजोन वर्तणून करणे