Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २७०
१७०९ आषाढकृष्ण १३

श्रीमत्कृष्णाककुद्यतीप्रीतिसंगमो जयति
स्वस्ति श्रीमदिदिराकरकमलोपरिष्ठिताष्टादशशक्तिपीठातस्थितशक्तिपीठमहासस्थान-

दक्षणावाराणसीश्रीकरहाटकक्षेत्रस्थविद्वज्जनसमूह यानी लेहून दिल्हे निर्णयपत्र ऐसे जे बापूजी रघुनाथ व भिमाजी बल्लाल व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ वास्तव्य कुमठे समत कोरेगाव प्रात वाई चतुर्वर्गा मध्ये दत्तकविशई कलह होवोनि क्षेत्रमजकुरास आले सदाशिव बल्लाळ यानी विनती केली की भिमाजी बल्लाळ यात व आह्मात कलह होउन आह्मि आपणा पासि अलो त्या वरून भीमाजी बल्लाळ यास बोलाउन आणिले या उभयता पासि राजिनामे व जामिनकतबे व तक्रिरा घेउन मनास आणिता दत्तकाचि चौकशी वर ठरले त्यास भिमाजी बल्लाळ बोलिले किं अपण महादेव गोसावि ब्रह्मचारी याचे पुत्र अपण ऐसे दत्त घेतले ऐसे साक्षी निशि व भूक्ति निशि व पत्रानिशि पुरवणि करुन देउ त्याचि चौकशी पाहता भुक्ति पुरवलि नाही मग साक्षिदार अणुन विचारिले कि तुह्मी सत्यपूर्वक काय असल ते
सागणे त्या वर साक्षीदारानि ब्रह्मसभेस येउन सागीतले किं दत्तविधान जाहले नाही आणि पुत्र घेतला नाही कागदपत्रा निशी पुरवणी जाहली नाहि आणि माहादेव बावा बोलिले कि अह्मि ब्रह्मचारी अह्मास कशास पुत्र पाहिजे ऐसे साक्षीदारानी सागितले अणि आज पर्यत पुत्रधर्माचे अचरण किमपि घडले नाही त्याजवरून बाळाजीपत यास पुत्र चौघे वडील रघुनाथ बल्लाळ त्याचे पुत्र बापुजी रघुनाथ व भिमाजी बल्लाळ व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ ऐसे चतुर्वर्ग बधु त्यास भिमाजी बल्लाळ यानी अपले बधु जोतिपत याचि स्त्रीस अपला पुत्र सखाराम दिल्हा ऐसे बोलत होते त्याचि चौकशी पाहता भिमाजी बल्लाळ याचे मुखे पुरवणी जाहलि नाहि आणि पुत्रधर्म अजि पर्यत काहि च घडले नाहि व माहाजरात सखाराम भिमाजी स्पष्ट ऐसा उत्धार अह्ये त्या वरून सखाराम पुत्र नव्हे ऐसे दोन्हि दत्तकाचि पुरवणी जाहली नाही ह्मणउन निवाडपत्र दिल्ले असे चौघा बधुनि यथाविभागे च्यार वाटण्या अपल्याल्या करून स्वस्तिक्षेम आसावे कोणि कोणासी परस्परे कळ करू नये हे निर्णयपत्र असे मिति शके १७०९ प्लवगनाम सवत्सरे आषाढकृष्ण १३ त्रयोदशी एव निर्णयपत्रस्यपक्तय