Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २७१
१७०८ - १७०९

श्री
तालिक
१ जबानी गोपाळ जोसी भिमाजी गोसावी याची मुज माहादेव गोसावी याच्या माडी वरी केली या उपरातिकआह्मास काही ठावके नाही
१ जबानी माणिक दीक्षित पढरपुरे भिमाजी गोसावी याची मुज कोणाच्या माडी वर केली ठाऊकी नाही त्या समई सईबाई हिने विचारिले को या मुलास ब्रह्मच्यारी करिता किंवा गृहस्ताश्रमी करिता त्यास महादेव गोसावी बोलिला की ब्रह्मच्यारी यास पुत्र कशास पाहिजे त्यास तो गृहस्ताश्रमी होईल या पेक्षा आह्मास ठाऊक नाही
१ येणे प्रमाणे रघुनाथभट गिजरे
१ येणे प्रमाणे भाऊ देशपाडे
साक्षी निशी पुरवणी करून देऊ ह्मणोन लिहिले ते साक्षीदार कोण आहेत त्ये सागणे

१ गोपाळ जोशी              १ विठलभट पढरपुर
१ माणिकभय पढरपुरे      १ भाऊ देशपाडे
३ रघुनाथभट गिजरे         १ गोविंदपत