Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २४०
श्री
तीर्थस्वरूप राजेश्री बाजीपत पोतनिवीस काका वडिलाचे शेवेशी
अपत्या समान रावजीबावाने व बाबाने कृतानेक नमस्कार विनती उपरी येथील
वर्तमान भाद्रपदशुद्ध १२ पर्यत श्रीकरहाटकक्षेत्र येथे समस्त सुखरूप असो विशेष आपली अज्ञा घेऊन निघालो ते श्रावणकृष्णसप्तमीस घरास सुखरूप पावलो आल्या तागाईत आपल्या कडील वर्तमान काही कळत नाही तर ऐसे न करावे सदेव पत्रद्वारा परामर्ष करावा वर्कड वर्तमान आह्मा कडील व्यकणभट्ट सागता निवेदन होईल बहुत काय लिहिणे आपण बोलिले होते की सप्तशतीचे वरणीचा शोध करू त्यास वरणी लागावयाची अशली तर शोध करून लिहून पाठवावे ह्यणजे येतो सर्व भरवसा आपला आहे कृपा निरतर करावी हे विनती इहैव सौभाग्यवती वज्रचूडेमडित मातुश्री उमाबाई काकीस नमस्कार वडिलास लिहिले आहे त्यावरून सर्व मजकूर निवेदन होईल बहुत काय लिहिणे हे विनती सौभाग्यवती वज्रचूडेमडित पाखराबायीस अशीर्वाद चित्तास खेद न करीत जावा बहुत काय लिहिणे लोभ असो देणे हे अशीर्वाद तीर्थस्वरूप राजेश्री देवबावास नमस्कार सागणे