Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २३९

श्री
वेदशास्त्रसपन्न समस्तब्रह्मवृद क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी -

विद्यार्थी भगवत आपाजी साष्टाग नमस्कार विनति उपरि येथील क्षेम जाणोन स्वकीय आसिर्वादलेख करून सतोशे पाववीत असावे विशेष वेदमुहुर्ती व्यकणभट व पुटभट जोतीश हुकेरी या उभयेतास आपणा कडे जोतीशपणाचे निवाडे बद्दल पाठविले होते त्यासी आपण निवाडा करून उभयेतास पाठविले उभयेता येथे आले उभयेतास स्वामीचे आज्ञे प्रमाणे सागितले वो। व्यकणभट आपणास हा निवाडा कलला नाही आपण स्वामी कडे जाईन एैसे बोलले वो। पुटभटास हि विचारिले निवडले प्रो। ऐकावयास हि रजावद व्यकणभटाने न ऐकलेस स्वामी कडे जावयास हि रजावद एैसे बोलोन उभयेता स्वामी पासी आले आहेत उभयतास रजावद करून उभयताची पत्रे येकाची येकास करून देऊन पस्टपणे आज्ञा करावी तेणे प्रो। वर्तणूक करू कृपा केली पाहिजे हे विनति