Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२५
१७७८ फाल्गुनशु॥ ५
श्री नकल
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद श्रीक्षेत्रवैराज याशि
प्रति समस्त ब्रह्मवृद करहाटकक्षेत्र साष्टाग नमस्कार येथील क्षेम तागाईत फाल्गुन शुद्ध ५ मी पावे तो सर्व वृत्त यथास्थित असे विशेष वो। नाना बिन कृष्णभट व सिताराम बिन कृष्णभट, उबराणी पालकर व शिराळकर भिक्षुक व गृहस्त याणी क्षेत्राची अवज्ञा करून नवीन पदप्रायश्चित वगैरे करितात व मशारनिले याणी मठाधिपतीचे नवीन पत्र साप्रदाय नसता करून घेऊन आह्मी क्षेत्रस्थ ह्यणून धटाई करितात यास श्री क्षेत्र मजकूर येथून वर लिहिले असामीस अन्नोदकव्यवहारा विषी निर्बधपत्रे गावगन्ना गेली आहेत तरी आपणास लिहिले आहे त्यास आपण क्षेत्री व आपले प्राती पालकर उभयता असामी व शिराळकर भिक्षुक व ग्रहस्थ यास अन्नोदकव्यवहारा विषई निर्बध ठेवावा क्षेत्राचा अभिमान क्षेत्रानी ठेविला पाहिजे या पत्राचे उत्तर यावे सुज्ञा प्रति विशेष काय लिहिणे लोभाची वृद्धि असावी मिति फाल्गुन शुद्ध पचमी शके १७७८ नळनामसवत्सरे हे नमस्कार
समत मुख्य असामींच्या
१ रघुनाथ दीक्षित गिजरे १ अनताचार्य घळसासि
१ रामकृष्ण दीक्षित गिजरे १ बाबाचार्य काळे
१ जगन्नाथ श्रौति ग्रामउपाध्ये १ सिद्धेश्वर दीक्षित गरूड
१ नारायण भट वैद्य १ मोर जोशी अणा
१ बाळभट अरणके १ बाबू दीक्षित वळवडे
१ बाबा दीक्षित गिजरे १ दादा दीक्षित उबराणी
१ भाऊ दीक्षित, ढवळीकर १ नाना विदार
१ राघवाचार्य टोणपे १ कृष्ण दीक्षित उब्राणी
१ दादा दीक्षित अटकेकर १ सखारामभट ढवळीकर
१ दादा दीक्षित गिजरे १ भाऊ निंळकट देशपाडे
१ भाऊ दीक्षित गिजरे १ बाळभट विदार
१ नारो आपाजी देशपाडे १ उद्धव जोशी
१ मोर दीक्षित अयाचित १ नारो पात्धे
१ गोविंद दीक्षित अटकेकर १ शिऊ पाठक
१ रामदेव १ गोविंद चार्य घळसासि
१ विनायक दीक्षित गिज्रे १ वामनाचार्य टोणपे पुराणिक
१ श्रीधरशास्त्री बहिरे १ बाळकाचार्य जगी
१ गणेशभट ग्रामउपात्धे १ दाजी दीक्षित उब्राणि
१ गोपाळभट ढवळीकर १ तात्याचार्य घळसासि
१ विष्णुशास्त्री सप्रे १ बाळकोबा ढवळीकर
१ कृष्णाचार्य कवटी १ मार्तड दीक्षित उबराणि
१ केशवभट राम पाटणकर १ बाबू भट लाटकर
१ केशवभट रायपाटणकर