Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २२३

श्री
नकल बद
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णाजी सदाशिव कुलकर्णी मारुलकर यासी
समस्त ब्रह्मवृद सातारकर अनेक आशीर्वाद विा तुह्मी सातारा मुकामी येऊन विदित केले जे भिमाबाई बारामतीकर इचे कन्येशी शके १७७५ फाल्गुनशु।। ८ चे दिवशीं मौजे वरठेमुकामी भिमाबाई बारामतीकर इचे कन्येशी मी खुद विवाह केला नतर शके १७७७ श्रावणमासी भिमाबाई गारवडास आली तेथे तिच्या कुळाचा व तिच्या जातीचा व कन्या कोणा पासून झाली वगैर सर्वानी अदेशा घेतल्या नतर विचार करिता भिमाबाईबरोबर हाली एक वृद्ध पुरुष आहे त्याला भिमाबाई माझा पति असे ह्मणती परतु सभेत आणून उभयतास विचारता भिमाबाई पत्नी व हा भर्ता व आह्मी केली ही कन्या विवाहित पती पासून जाहली असा पुरावा त्याज कडून आला नाही त्याज वरून आह्मी त्या कन्येचा परित्याग करून सर्व शिष्टास शरण आलो तरी सर्वांनी कृपा करून विजातीय कन्येशी विवाहससर्गदोष घडल्या पासोन प्रायश्चित्त देऊन मुक्त केले पाहिजे ह्मणोन विदित करून लिहून दिल्हे त्याज वरून सर्व शिष्टानी तुमचा अनुताप व तुमची शक्ति पाहून श्रीलक्ष्मीनारायणाचे देवालयात समस्त विद्वत्समाजे द्वब्दप्रायश्चित विधिपूर्वक देऊन + + + +