Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२४
१७७८ श्रावणशु॥ १३
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी
सेवक सिताराम माणकेश्वर बोकील इनामदार मौजे उपलव का। मायणी कृतानेकसिरसाष्टाग नमस्कार विनति विज्ञापना ता। श्रावणशु।। १३ पावे तो आशीर्वादे करून सुखरूप असो वि॥ आह्मी कराड मुकामी आमास येकपक्ती अन्नोदकवेवार होऊन पावन केले मौजे मजकुरी आमचे घरी वहिवाट कर्ण्या विषयीचा बदोबस्ता विसी नरसो अणा व पाडोबा तात्या ग्रामउपाध्ये या उभयेतास पा। त्याणी गावची वहिवाट चालू केली नाही सबब श्रावणी उभयता पो। पाडोवातात्या याणी करून नतर जावे अशा करारा प्रो। उलगडा करावा आशि गावचे बदोबस्ता विसी आपल्यास कळवून वहिवाट चालू करावी असे ठरले असून अन्नपानावर बसावयाचे वेलेस ऐवज पदरात घातल्या खेरीज तुमचे घरी जेवणार नाही असे बोलल्या वरून आमची खातरी नसेल तर निशा सावकारी देतो अगर तुमचे बरोबर शिपाई देऊन बोलल्या प्रो। उलगडेल असे बोललो असता कोणती हि गोष्ट कबूल न करिता निघोन गेले त्यास मज कडून बोलल्या जाबात व्यत्यय येणार नाही अशी खातरी श्रीस हि आहे व आपणास हि आहे असे असोन विटबना कर्णे नीट नये माझा श्वीकार केला च आहे हा अभिमान वागविण्याचा असल्यास सर्व बदोबस्त कर्णे आपल्या कडेस आहे मी बोलल्या प्रमाणे व्यत्यय आणीन तर श्रीची च शफत असे सर्वस्वी आधार आपला आहे जसा साभाळ कर्णे असेल तसा लौकिक सौरक्षण करून करावा तात्या कमजाजती मजकूर सागून माझे विसी वित्यय आणितील त्यास वित्यय येऊ नये
सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना