Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२९
१७७९ आषाढवा। ५
श्रीशंकर नकल
सिका
श्रीमच्छकाचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारतीस्वामीकर-
कजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामीकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व ज्योतिषी व राजकीय ग्रहस्त व देशमुख व देशपाडे व पाटील कुलकर्णी का। मा।र परमशिष्योत्तम यासी आज्ञा केली ऐसी जे शके १७७८ नलनामसवत्सरे सस्थानदेवतेचे स्वारीचे सचारउदेशे सातारप्राती आगमन जाहाले समईं गावगनानी पाहता हिदुलोकात ज्ञातीधर्मास विरुद्ध वहिवाट होत असल्याचे दिसून आले सबब ये विषयीचा विचार सस्थानातून जाहला पाहिजे याज करिता सदरहूच्या बदोबस्तास सस्थानातून मठाधिकारीपणाचे कामावर वो। राजश्री नाना बिन कृष्ण दी।। व सिताराम बिन बाबा दी।। उबराणीकर राहणार पाल या उभयतास नेमून आज्ञापत्रे दिल्ही आणि ज्ञातिधर्मास विरुद्ध वागतील त्याज विसीचे सस्थानास कळऊन आज्ञे प्रमाणे बदोबस्त ठेवीत जाणे अशी आज्ञा जाहली त्या प्रमाणे सदर उभयेतानी तजवीज ठेविली असून क्षेत्रकरहाटकस्थ ब्रह्मवृद याणी मठाधिकारीपणाचे आज्ञापत्र घेतले त्याज मुळे उभयता बरोबर द्वेष करून निग्रहपत्र पालीकर ब्रह्मवृद यास लिहिले त्याची नकल सदर उभयतानी आणून हजर केली ती अबलोकनात येऊन आज्ञापत्र तुह्मास सादर जाहले असे तरी सदर कराडकर याणी उबराणीकर उभयता यासी द्वेषबुद्धीने निग्रहपत्र लिहिले हे अयोग्य आहे मठाधिकारी वगैरे याची वहिवाट पाहून निग्रह ठेवणे अगर शुद्ध करणे हा अधिकार सस्थान मठ करवीरकरचा कराडकर दरम्यान धादल करून पत्र लिहिले हे बरोबर नाही कराडकर हे परभारे धादल करितात ये विसीचा बदोबस्त सस्थानातून होणे लौकर होईल तुह्मी सदर उभयता मठाधिकारी उबराणी राहणार पाल याचे घरी व पक्तीस अन्नोदकव्यवहार पूर्ववत् प्रो। करीत जाणे आणि कराडकर याणी पत्र लिहितील ती कोणी मानू नयेत असा बदोबस्त ठेवूत विनतिपत्र पा। देणे विशेष लिहिणे ते काय मिति फाल्गुनव॥ ३ महानुशासन वरिवर्ति मोर्तब असे पो। आषाढवा। ५ शके १७७९ हस्ते सितारामभट उबराणी पालकर