Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २२२
१७७४ माघवा। १४
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे शेवेसी
विद्यार्थी मोरभट बिन पाडुरगभट जोशी का। काले साष्टाग नमस्कार विज्ञापना तागायत माघशु।। १३ आपले कृपे करून सुखरूप असो विशेष आमचे चुलते वो।। राजश्री हरभट जोशी कानेरे याचा मुलगा बाबाजी हा अदमासे सोळा सत्रा वर्षे घरात वेड लागून कोठे बाहेर गेला तो मृत्य पावला त्याचे क्रियाकर्मातर हरभटजी करीत नाहीत असे वाटते त्याचे कारण खाली लिहिले असे त्या वरून ध्यानास आणा जो पिशाच्च जाला आणि आमचे बहिणीचे आगात येऊन त्याणे आपले नाव सागितले आणि याने क्रिया करावी ह्मणजे मी गती घेतो असे बोलला परतु ते काहीच करीत नाहीत आमची बहीण त्या पिशाच्याने मारली या स्तव हाली मन कुठित आहे तर भटजी याणे आपले लेकाचे क्रियाकर्मातर करीत नाहीत यास्तव याज वर बहिष्कार घालावा ह्मणजे ते क्रिया करतील आणि पिशाच गति घेईल हाली ते आह्मास उपद्रव करीत आहे या स्तव या वेळी तजवीज फार जरूर जाहाली पाहिजे ही अर्जी लिा।। सही तारीख १८ फेब्रुवारी १८५२ इसवी त्याज कडून क्रिया करविली पाहिजे ता। मा।र
सही मोरेश्वरभट जोशी दस्तूर खुद
साक्ष
१ गोपालभट बिन गोविंदभट जोशी
कालेकर दस्तूर खुद
१ बाळकृष्णभट बिन नारायणभट
येळगावकर राहणार वस्ती मजकूर दस्तूर खुद
१ पाडुरगभट बिन आत्मारामभट
डोइफोडे चोरगावकर हाली वस्ती मौजे काले
१ गोविंदशास्त्री चिवटे दस्तूर खुद