Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१९
१७१३ माघवद्य ११

श्री

श्रीमद्रमारमणचरणसपर्यापरायणात करण राजमान्य राजश्री देशाधिकारी व देशमुख व देशपाडे व राजकीय ग्रहस्त व ब्राह्मणसमुदाय वास्तव्य को। खटाव व मौजे कुरुड व मौजे वडूज यासि

स्नेहयुक्त समस्त ब्राह्मण क्षेत्रकरहाटक कृतानेकाशिष सतु विशेष सखभट बिन जिऊभट व मुगरभट बिन जिवभट जोतिषी व रत्नाकर त्रिमळ कुलकर्णी मौजे वडूज प्रातमजकूर या त्रिवर्गास शुद्धपत्र देऊन तुह्मा कडे पाठविले होते त्यास मागाहून येका दोघानी पत्र पा। की आह्मास कळले नाही ह्मणून जिवभट उभयता क्षेत्रास आले त्याज वरून पुन ज्यानी पत्र लिहिले होते त्याची एकवाक्यता करून तुह्मा कडे पत्र देऊन पाठविले आहेत तर पूर्वी शुत्धपत्र दिल्हे आहे त्या प्रमाणे येकपक्ति अन्नोदकव्यवहार करणे तेथे क्षेत्रस्थ ब्राह्मण येऊन अन्नोदकव्यवहार करण्या विषई दिक्कत न करणे त्यास येथे च पक्तिपावन करून पा। आहेत तर मधील पत्राचा सशय न धरणे मिति शके १७१३ विरोधकृतनामसंवत्सरे माघवद्य ११ हे आशीर्वाद