Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

साबणे रुद्राजीपंत बोलिले भोगाचे विचारितील तरि आह्मावरि घाला आह्मी सागोन त्यावरि हुजुरुल कारकूनी भोग विचारिता आपण पत्रे आणिली नाही परभारे विजापुरून आलो तुह्मास सदेह असेल तरि वाईचे यारिदी आले असेति त्यास विचारणे तीही त्यास पुशिले तीही दसत अमल दाखविला + + रुजु झाले नारायणभट्टासि मागती खाने पाचारून नेउन सागाते महालदार देउन खुर्दखत देउन बनाजीपताचेथे पाठउन दिल्हे नारायणभट्ट खुर्दखत घेउन नवा ठाणदारासागाते वाईस येउन इनाम दस्तीबाद करून भक्षू लागले या उपरि बापूस मी बोलिलो नारायणभट्ट येईल अण पद्मणभट्टाबाबति खुर्दखत मागोन देइन ह्मणत होतासि तरि मागीतले की नाही तो बोलिला म्या मागावे तरि खालिलेकडे गेलो तिकडे दोनि महिन्ये लागले आता मागोन देइन ऐसे ह्मणोन नारायणभट्ट व्याख्यान सागत होता त्यास मागीतले तुजजवळि पद्मणभट्टे खुर्दखत दिधले ते दे रगोवास देइन ह्मटिले आहे त्यावरि नारायणभट्ट बोलिला ते पत्र कार्यास नये रगोवा घेउन काय करील त्याचा इनाम तरि मुरादखाने बिदुमाधवास दिधला आता व्यर्थ कटकट करून काय बापू बोलिला पत्र तो देतो यत्‍न करील नारायणभट्टे पत्र दाखविले बापू बोलिला कागद दे नारायणभट्ट बोलिला तुझे मनी इतके आहे तरि म्या पिपरी तिसा बिघ्याची अर्ध्द चावर करून दिधली तो पाउ चावर दे मग हे घे नाही तरि उगाच अस याउपरि मी जवळि गेलो बापूस धामास चाल ह्मटिले मग तो मी घोमास जाता पत्राचे काय केले तो बोलिला ते पत्र कार्यास नयेसे झाले त्यावरि नारायणभट्ट आठ वरिषे वाचला असता वाडे व इनामाची खडपत्रे साविसा वर्षाचा कागद बापू पासून लेहून घेतला नारायणभट्ट मेल्याउपरि ही खडपत्रे केली ते काळी पर पसरणीची गोष्टी केली नाही याउपरि स्वार्थ धरून पसरणीचा व्यवहार उद्भविला आह्मी पिंपरीचा उद्भविला व तुज पसरणीस सबध नाही ह्मटिले त्यावरि बापू मेला त्याचे पुत्र ही झगडले अती कृष्ण जोशी मध्ये पडोन समजाविले त्याची ताबगिरी पिंपरी बाबति पत्रे त्यास दिधली हा काळपर्यत उगेच होते आता मागुती कळह करिताति तरि पूर्वी बापूने मज पदमणभट्टाच्या पाउ चावराचे खुर्दखत देइन ह्मणउन बोलिला होता यास साक्षी नारायण जोशी आहे पर त्याचे लिहिले नाही व व्यवहार सागावला ह्मणजे गई करिताति तरि ज्या प्रकारे त्यापासून मज पदमणभट्ट पत्रविभाग प्राप्‍त होय ऐसे त्यास मन पूत लेहून देउन त्यापासून पत्र लेहून घेउन याच पत्राच्या बळे त्याशी व्यवहार सागोन जेथे पद्मणभट्टाचा पाउ चावर लागेल तो माझा मी घेइन बापूस व बापूच्या मुलास सबध नाही ऐसे करीन जरि त्याच्या मनासारिखे लेहुन ने दी तरि त्यापासून मज लिहिले प्राप्‍त नव्हे हा काल पर्यंत उपेक्षा केली ज्ये पिंपरी बुडेल याउपरि उपेक्षा करिता नये याकरिता मनास ये तैसे आमोजीस व येकोजीस पत्र लेहून देतो व त्यापासून पत्र लेहून घेतो जाणिजे व तुह्मास जो पिंपरीबाबति पाउ चावर देवविल तो पद्मणभट्टाचे पाउ चावराचे पत्र तुह्मास मागेल अथवा जो पिंपरीच्या पाउ चावराचे पत्र नारायणभट्ट नरशिगरायास सागोन अर्ध चावराचे करून दिधले नाही ऐसा जो रवा काढील तो तुह्मास पद्मणभट्टाचे पत्र मागेल परतु जो दसत अमल व दस्त व तुमच्या इनामाचे खुर्दखत पाहून शेणोपणधर्मे मुनशिबी करील तो तुमचा इनाम घा ह्मणेना वकिळातीने जी मुनशिबी करील तरि त्यास चालेना यात ईश्वरेच्छा प्रमाण                                               साक्षी

पद्मणभट्टाबाबति खुर्दखत तरि नारायणभट्ट मेल्याउपरि मी महाबळेश्वरास गेलों माघारि या बापूनें खुर्दखताचा बोकचा अपल्या घरास नेला त्यामध्यें होते मीं महाबळेश्वरून आलो इनाम वाटिले खुर्दखताचा बोकचा मजपाशी दिधला तो खुर्दखत पाहिले त्यापरिते देखिले नाही

येकवीरा