Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८४ १५६२ ज्येष्ठ वद्य २
→पुढील मजकुर वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सकलगुणसौजनी माहा राजमानी राजश्री वेदमुहूर्ती राजश्री रंगभट चित्राव सेकीन का। वाई गोसावीयाचे सेवेसी सेवक कासी रंगनाथ खोत जकाती पा। मजकूर सास्टांगी नमसकार विनंती वयाकारणे ऐसे उपरी हाजीर मजालसी सरगुऱ्हो वा नाईकवाडी पा। मजकूरु सु॥ इहिदे अर्बैन अलफ कारणे लेहून दिल्हे दानपत्र ऐसा जे तुमचे देवापासी नंदादीप रोजीना तेल ।. अपण अपले बकामधे तुह्मासी दिल्हे असे आपण वटीतो तो चालवीन आपणामागाते जो कोण्ही होईल त्याणे चालवावे या दुसमान होईल त्याने हि चालवावे जो कोण्ही इस्कील हिंदु करील त्यासी गाईचे आण असे मुसलमान होउनु मोडील त्यासी मुसाफेचे आण असे जो कोण्ही खोत होईल त्याणे चालवावे हे कागद सही
कासी रंगनाथ
खोत बिकलम
तेरीख १५ माहे सफर