Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ८५                                                                                                                                      १५६२ माघ शुध्द १०                                                 
 
2 1 स्वस्ति श्री शके १५६२ विक्रम संव(त्स) रे माघ शुध्द दशमीस त्र्यंबकास रंगभट चित्रावे लेहून दिधले जे पूर्वी बापू समागमे बुबाचेथे उपचारास मी जात असता ती सवतीच्या पुत्रास उपचार केला तीणे होन २ व शेल्यास होन १ पिंपरीवरि लेहून द्याव्यास तुबाजीस आज्ञा केली त्यावरि बापू बोलिला याचे वारिचे अपण्यास पुढे चाले ऐसे इनामाचा कागद दे मग ते बोलिली मज खेळखाना फार गाव लाहान तेथे इनाम देयिना बापू बोलिला तुझे गावीं वाजट भूमि आहे तूज तीचे काही येत नाही त्यातून विश्वे ३० तिसाचे खुर्दखत दे पुढे आह्मास कामा येईल तुज प्रस्तूत मागो ना मग तीणे तुबाजीस परवानगी दिधली त्यासी सूत्र पहिलेच केले होते त्याणे खुर्दखत लिहिता त्यामध्ये पाउ चावरास ४५ टके व गल्ला मण ॥। घातले ऐसे भोगवट्याचे कागद । चावराचे चारि पाच वर्षे केले पर काही प्राप्‍त होत नव्हते याउपरी खडकीस बापू ग्रामकळहसबधे गेला पाउ चावराची खुर्दखते केली गावास आला मुधोपतास दाखविली तीही ह्मटिले ही रुजू पडेतना याउपरि मुल्ला ताजद्दीचे ऐले मिसली कराव्या गेला त्याणे खुर्दखत पाहिले तो बोलिला अवघ्या इनामदाराचीं खुर्दखती बेरीज नाही यातच बेरीज कां इतक्यात पिपरीचा कुळकरणी आला होता त्यास पाचारिले तुझा दस्त काढि ह्मटिले दस्त वाचिविला तो त्यामध्ये हा इनाम वाद नाही ऐसे देखोन बोलिला ऐसे इनाम ताबगिरी करिता त्याउपरि खुर्दखत बगलेस घातले मिसली फाडून टाकिली त्यास बोलिला घरास जा बापू घरास येऊन तुझा बाप नारायणभट त्यास समाचार सागितला दोघी विचार करून मुधोपताचेथे गेले समाचार सागीतला ते बोलिले मी पूर्वी च तुह्मास बोलिलो आता तातडि करू नका याचे शीघ्र च ठाणे फिरणार आहे पर तुह्मी तीचे अर्ध्द चावराचे खुर्दखत मागा ह्मणजे पचेचाळीस टके पुढे तर्‍ही रुजू पडतील नाही तरि बेरीज तर्‍ही घालऊ नका मग घरास आलो (या) उपरि तुबाजीची भेटि घेतलि त्यास बोलिले हे वर्तमान ऐसे झाले तरि तुह्मी बुबुमाची खुर्दखते अर्ध्द चावराची ४ करून घाला तरि काळातरी कार्यास येतील तो बोलिला तीस हा अर्थ सागता नये ते कटकास जाते वेचाचे आह्मास लिगाड लाविले अवघा गाव हिडिलो भोयास द्याव्या होन २ मिळेतना मग नारायणभट्टे अपले जोडे बापूचे हाती दिधले त्याणे तुबाजीस दिधले त्याणे सराफाचेथे मोडिले होन २ घेउनु तीच्या भोयास दिधले तीस सागीतले रामेश्वरभट्टाचे होन दोनी कळातरे घेतले यास कतबा देणे व यास भोगवट्टयाचे कागद पाहिजेत ते देणे तीणे द्या ह्मणउन बोलिली त्यावरि त्याणे भोगवटे व दो होनाचा कतबा आणून दिधला याउपरि विज्यापुरून नरशिगराव पेशवे वाईस आले त्यास नारायणभट्टे हा सर्व वृत्तात सागीतला तो बोलिला हा ठाणदार अमचा जानीब नव्हे याशी आह्मास कामे बोलता नयेत मी कटकास जातो तुह्मी मज सागाते या तुह्मास ताजे खुर्दखत करून देईन नारायणभट्ट बोलिला मज येता नये व्याख्यान राहील तरि तिमाजीपत तुमचे खासनीस त्यापशि पत्र देतो तो तुह्मास स्मरण देईल महाराजे तेथून करून पाठविल्या उत्तरोत्तर पुण्यपुरुषार्थ घडेल मग तिमाजीअधीन पत्र केले कटकास जाउन महिन्या २ दोमध्ये धाडून दिधले