Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २१०. १७०३ फाल्गुन शुद्ध ७.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १९ फेब्रुवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपण छ चें पत्र पाठविलें तें पावलें. इकडील वर्तमान तरी वरचेवर होतो, तो मजकूर आपणांस राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव लिहितच आहेत. व नवाबबहादुर यांजकडे बातम्या येतात, त्यावरून आशंका घेऊन बोलल्याचा वगैरे मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. ऐसियास येविसींचा मजकूर विस्तारें राजश्री नाना यांनीं आपणांस लिहिला आहे, व येथून राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव यांस आह्मीं लिहिला आहे. त्यावरून सविस्तर कळों येईल. नवाब बहादरासीं बोलोन इंग्रजांची तंबी होऊन होय तें करावें. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रवाना छ ६ रविलोवल बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.
पोष्य लक्ष्मणराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति. लिहिलें परिसोन निरंतर पत्र पाठवून संतोषवित जावें. बहुत काय लिहिणें लोभ करीत जावा हे विनंति.