Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १६ लेखांक २०७. १७०३ माघ व।। १.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर प्रसन्न. ३० जानेवारी १७८२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करित असावें. विशेष जालिहाल तालुका व पर्वत गिर्दनवाई सुद्धां व फौजेचे बेगमीस आठ लक्षांत सरंजाम वसुली देशीलगता नवाब बहादरासीं बोलून लावून घेणें, ह्मणोन राजश्री आनंदरावजी बाजी व गणपतराव केशव यांस लिहिलें आहे. तरी आपण व उभयतां मिळोन नवाबबहादरियासी बोलून जालिहाल तालुका पर्वत गिर्दनवाई सुद्धां व फौजेचे सरंजामास आठ लक्षांचा मुलुक वसुली देशीलगता लाऊन देत तो अर्थ करावा. आठ लक्षांचा तालुका देशी लगता वसुली लावून घ्यावा. येविसीं राजश्री नाना यांनीं आपणास पत्र व नवाबबहादर यांस थैलीपत्र लिहिलें आहे. त्यास त्यांची मर्जी ठीक राहून कार्य करून घ्यावें. निरंतर पत्रीं संतोषवित जावें. रवाना छ १५ सफर बहुत काय लिहिणें लोभ करित जावा हे विनंति.