Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६३
(पहिला बंद गहाळ)
होता ते वेलेस नागोजी बिन हिरोजी बदअमल वर्तला त्याजवरून पठाणमजकू याणे अर्जी लेहून बेदरास पाठविली तेथून नागोजीस धरणी आली. तो गावातून पलोन आलंद्यास बांदलाची पाठ निघावयास जात होता तेव्हां गुंजवणी अलीकडे श्वारीस सापडला तेथेंच डोसके मारिले मग गोजावा त्याची बायको अग्नि घ्यावयास लागली ते वेळेस आपले वडील हारजी व गोमाजी मौजे मजकुरी नांदत होते त्यास हारजी साहाजी माहाराजाकडेस चाकरीस गेला होता व गोमाजी गावावर नांदत होता ते वेळेस गोजावाचे समाधान केले की तू आग निघू नको. मूल जतन करून गावचा कारभार करून राहणे त्याजवरून ती राहिली त्याजवर हारजी व गोमाजी बावास देवआज्ञा जाली. त्यावर दादो कोंडदेव या प्रांती आले मुलकास कौल दिल्हा त्यांचा चाकर नावडकर मौजे धागवडीस कमाविसी ठेविला त्याने आपली सीव मनाईची पहिली होती ती अलीकडे रेटून घातली त्यावर दादो कोंडदेव सावरदरियाचे मुक्कामी आले तेव्हां गोजावा जाऊन सावरदरकर पाटिल याच्या हाते भेटली तेथे पाटिल मजकुराचा कांहीं कजिया होता तो विल्हेस लाविला त्याजवर दादो कोंडदेव बोलिला जे, गोजावा कर्ती माणूस आहे. तेव्हा गोजावाने अर्ज केला ज आमची सीव दागवडकर याणी रेटिली मग सावरदरकर पाटिल बोलिले की इची समजावीस कांहीं देऊन करावी मग दादो कोंडदेव कृपाळू होऊन गावची वाहातीची जमीन बारा रुके दील्ही अगोदरचे इनामती रुका होता तो गोजावाने व अवध्यानी टाकला त्या ता आपला भोगवटा राहिला त्यावर सिवाजी माहाराज या प्रांतास आले त्याजबरोबर आपले राजे त्रिंबकजी व मलकोजी रायगडास आले तेव्हां त्रिंबकजी माहाराजा जवळ राहिला व मलकोजी पुरंधरास सरनोबती करावयास माहाराजानी पाठविला. मग बापोजी व चापाजी व भानजी गावावर आले तेव्हां मलकोजीस सरनोबती पुरंधरची जाली ह्मणून वर्तमान कळले मग भेटावयास पुरंधरास गेले जाऊन भेटले तेव्हां यास वस्त्रें देऊन गावास पाठविले यावर वरसाभरा मलकोजी गावावर गाव पाहावयास आले तेव्हां चापाजीस पुसिले की होळीस पोळी कोण लावितो त्याजवर चापाजी बोलिला की गोमाजी बावानें गोजावास कामकारभार सांगितला आहे त्यावरून हाली बापोजी होळीस पोळी लावितो त्याजवर बापोजीची व मलकोजीची कटकट जाली. मग बापोजी बोलिला की तुह्मी वडील आहात गोमाजीबावानी आपल्यास गावचे कामकाज सोपले ह्मणून आपण होळीस पोळी लावीत होतो त्यास तुह्मी गावावर एऊन राहणे मग काय तुह्मी सांगाल त्याप्रों। वर्तूं. त्याजवर मलकोजीने मोकदमीचे वाडे व सेतपट्या सुमार ८ पैकी निमे ४ बापूजीकडे व च्यार आपणाकडे व वाडा सुमार हात १०० शंभर पैकी निमे आपणाकडे निमे त्याजकडे येणेप्रमाणे वाटून घेतले यावर तान्हाजी भालेघरे यास होन साठ देऊन दगड धोंडा आणविला त्याजवर धोंडे घेऊन आले विहीर पडित पाडिली आणि गोठा हि तेथे बांधिला पुढें इनाम पासोडी हक्क लाजिमा याचा बंदोबस्त करून घ्यावा तो रायगडचे बोलावणे माहाराजाचे आले त्याजवर ते चाकरीस गेले ते तिकडेस वरीस साहा महिने राहिले पुढे पातशाही गर्दी जाली. मुलूक उज्याड जाला त्यावर त्रिंबकजी व मलकोजी यांस देवआज्ञा जाली पुढें न्याहारखान या प्रांतास आला त्याणें मुलकास कौल दिल्हा त्याचा अंमल दोन च्यार वरसें चालिला पुढें हायबतराव निंबाळकर याचा दंगा जाला ते वेळेस अर्जाजी हाटे याणी बहिरजीस होळीच्या पोळीस दोही दिल्ही कजिया मातबर जाहाला पुढें बिल्हेस लागावा तो मुलूक उज्याड जाहाला तेव्हां तैसेच राहिले त्याजअलीकडे विठोजीची व आपली कटकट जाहाली त्यावर मोरोपंत देशमुख गावास आले उपरांतीक विंगास गेले इ.इ.इ.