Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ५८

श्री.

कुलकट कसबे सासवड येथील व पाटिल जगथाप व कुलकर्णी व देशकुलकर्णी निजामशाही कारकीर्दीस मलिक दादर हवालदार किले पुरंधर याचे बापास आवशाचा हवाला होता त्यांचे कारभारी लाखोपंत आत्रे व रायबेल पातशाहा वेदरचा त्याजपासी ज्यामत पाटिल बिन हर्‍या पाटिल चाकर होते तेव्हां शाहाची दाई होती तिला बारा गांव मोकासा होते तिणे ज्यामतपाटलास व लाखोपंताचे पुत्र विठलपंत यांस मलिक दादराबरोबर देऊन बारा गांवचा अंमल करावयास सांगितला त्याणी एक साल अंमल केला दुसरे सालीं दाईजवळ अर्ज करून वतन मागितलें तेव्हा दाई बोलिी कीं नजरसिवाय वतन कसे होतें मग या दोघानीं दाईजवळ नजर अडीचशें होन करार करून देशमुखी व देशकुलकर्ण हीं दोघांनी दोन वतनें करून घेऊन पातशाही फर्मान करून घेतलें आणि स्वार ठेऊन जबरदस्तीनें गांवावर चढाई केली गांव बितपसील.

मौजे खलद प्रांत पुणें १ मौजे कोढीत बुद्रुकु प्रांत पुणें १
मौजे दियें प्रांत पुणे १  मौजे सासवड प्रांत पुणें १
मौजे बेलसर पो। सुपें १ मौजे बाबुर्डी पो। सुपें १
मौजे कारखेल पो। सुपें १ मौजे माढवें पो। सुपें १
मौजे काळोली पो। सिरवळ १ मौजे रांक पो। सिरवळ १
मौजे मोरवें पो। सिरवळ १  मौजे पिंबुर्टी पो। सिरवळ १

एकूण बारा गांवावर चढाई केली पैकीं मौजे मारवें व मौजे पिंबुर्टी हे दोन गांव हस्तगत जाले नाहींत बाकी दाहा गांव हस्तगत करून देशमुखीचा व देशकुलकर्णाचा अमल बसऊन मौजे संवत्सर प्रांत पुणें एथें आले तेव्हां उभयतांनीं विचार केला कीं या दाहा गांवांत एक कसबा असला पाहिजे तेव्हां पुणेंप्रांतींचे गांव मोडिले बितपसील.

मौजे संवत्सर १ मौजे हिंगणें १
मौजे सरंडी १  मौजे सासवड १
मौजे तरंडी  लग ०
मौजे पिंपळगाव १ लग ०

एकूण साहा गांवची जमीन एक करून एक सासवड कदबा व पेंठ सोमवार ऐसें केलें त्याचा संवत्सर शके १४०१ विकारी नाम संवत्सरी कसबा केला सदरहू साहा गांव मोडिले तेथील पाटिलकी कुंटे यांची व कुलकर्णी गिधवे व ज्योतिषी राखे असे होते पैकीं जगथापाचे कुंटे मावसभाऊ होते ते जगथापानीं बाहेर घालून पाटिलकी व देशमुखी करूं लागले गिधव्यांचें संतान नाहीसें जालें एकच ह्मातारा निपुत्रिक होता त्यांचे वतनाचे गांव आठ होते त्यापैकी सदरहू गांव पुणेंप्रांतींचे मोडले ते सहा व सोनोरी व दिये हेही पुणेंप्रांतींचेच दोन एकूण आठ त्या पै॥ गिधव्यांनीं आपली कन्या पानसियांसी दिल्ही होती तिजला आंदण दिल्हे गांव सोनोरी व दिये हे दोन गांव दिल्हे बाकी साहा गांव मोडले सबब कुलकर्ण मौजे सासवडचे करीतच होता कितेक दिवस त्याणें कुलकर्ण केलें मग त्याजला बुध्दि काशीयात्रेस जावें असी जाली तेव्हां विठलपंत आत्रे याजपासून कांहीं द्रव्य घेऊन कुलकर्ण त्याचे स्वाधीन केलें आणि काशीयात्रेस गेला तेव्हांपासून आत्रे याचें कुलकर्ण कसब्याचे जालें राखियाचें ज्योतिष कसबे मजकूरचें त्यास राखियाचा हि वंश बहुत नव्हता परंतु राखियांनीं जगथापाची देशमुखी पाटिलकी व आत्र्याचें कुलकर्ण देशकुलकर्ण जालीयावर बहुत दिवस त्याची ज्योतिष केलें त्यांत एकच पुरुष राहिला तो काळादुकाळामुळें उठोन गेला तेव्हां गांवाचे ज्योतिषपणाचें वतन चालवावयास कोणी नाहीं तेव्हां देशमुखांनीं व देशकुलकर्णियानीं विचार करून पुरंधरे यांचे हवाला केलें जे समाईं जगथापानीं देशमुखी व आत्रे यानीं देशकुलकर्णीपण साधिलें ते समई बरोबर जे जे कामाकाजास आले त्यांस वतनें करून दिल्हीं बितपसील.