Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ६०

(प्रारंभ गहाळ)

कागद तान्हाजीराम देसपांडिये पिसरानि मोरो तानदेऊ देसपांडिये यांसि देत गेलों नजरबाद लिहिली नाहीं तान्हाजीराम व मोरो तानदेऊ होनप देशपांडिये व नामाजी लांडा गुमास्ता हयातहकजा इंलाही फौत गुदरोन गेला बादज चंद रोज फर्जंदानी नामाजी गुमास्ते बइसीम आपाजी व तुकावा व अंतावा व यादव व रंगावा यैसे सदरहू दर सरकार सीवाजी भोसले नवकर सूद यादो नामदेऊ ममलकतमदारुलमाहामीं दिवाण संभाजी राजे भोसले दीगर बिराजरान आपाजी व अंताजी दर कार मुलिकगिरी व लस्करगै मामले करून बख्तावार होऊन आपलें वतन ह्मणौनि जोरावारी करूं लागले दीगर हिमाती निलो सोनदेऊ अज दिवाण सीवाजी राजे भासले यांचे सगे खेश सोइरे सदरहू अंमल फैला असतां दिलीहून पातशाही फौजा दक्षणेवरी मोहीमदारी कामा नबाब उमदतुलमुलुक अमीरउमराये दर कसबे पुणे दाखल (जाले) सा तरीके बाबाजीराम देसपांडिये असतां तमाम मोकदम व रयां कर्याती मावळ एऊन रुज होऊन मुलाअजमती व कौल सिरपाव सरफराजी जाली हक व लाजिमे सिरस्ते कागद तरफ मजकूर मुतसरफ असतां आपाजी व तुकावा पिसर नामाजी लांडियास मोकदम व पटवारी ह्मणत असेती कीं हक लाजिमा सिरस्ता कागद बाबाजीराम देसपांडिया कर्याती मजकूरीचा घेत असतां तुह्मी आह्मांसि नाहक घसघस करितां तरी हे गोष्टी वाजिब दिसोन येत नाहीं तों नवाब अमीरउलउमराये बमै सुबे मुलाजमत हजरती देहली कुच होऊन दिलीस गेले तो सुभे मिर्जा राजा पाईन केले पुरंधर बमै लस्कर घेरा घालून सिकिंदा केला ते वख्ती सिवाजी राजे भोसले मुलाअजमतीस एऊन किले व मुलूक दौलतकाहिरे मुबारक दाखल जाला तमाम जमीदारानी व देसमुखानी व देशपांडियानी व मोकदमानी प्रगणे पुणा व कर्याती मावळ व बारा मावळे ते वख्ती बहुजूर मिर्जा राजा व सिवाजी राजे अर्जदास बुलईल तमासा करून वतन होन ३००००० तीन लाख बर करार जाले पैकी अज दुमाले वतन कर्याती मावळ दाखल केले ते वख्तीं मोरो विठल व बाबाजीराम देसपांडिये याणी सिवाजी राजे साहेबांस अर्ज केला कीं तरफ कर्याती मावळ देसपांडेगिरी अहद (पुढें फाटलें आहे) हमेशा होत गेला बाद अज सिवाजी राजे फौत होऊन कैलासवास केला तो यादव पिसर नामाजी नोकर संभा भोसले बमै लस्कर चंदी व करनाटक मुलूक ताख्त ताराज करून जमीदार व पुंड पाळेगार यांचे सिरी तोफ ठेवितां दरमियान यादो नामदेऊ बखतवार होऊन मुदमगीम मबलग नजरबांदके लागली तो आपले करमबंदगेस मुखताले ए जिल्हे अज लस्कर मनूर ज्याफर असरके अवलियाये दौलतकाहेर मुकाम फर्मूद होउनी यादी अवरंगाबाद असतां सुबे गाजुद्दीखान बहादूर फेरोजंग दर पुणे आमदरफ्त सा तरीके बाबाजीराम देसपांडे तमाम मोकदमानी प॥ पुणे व कर्याती मावळ मुलाजमत बंदगानी नवाबसाहेब कौल सिरपाव व सरफराजी बवख्त हक व लाजिमा व सिरस्त कागद दस्तू साबीक बाबाजीराम देशपांडिये अमल दखल करून मुतसरफ असतां विजापूर व भागानगर फते करून सन १०९९ रायात अलियात बंदगान हजरती दिलसुभानी दर मौजे तुळापूर मुकाम जाला तमाम जमीदारानी व देसमुखान व देसपांडियानी व मोकदमानी व रयानी पा। पुणे व बारा मावळे वगैरे दर कचेरीवाला रुजू होऊन अरबाब अदालती बादरगाह अस्मान ज्यांहा दिलसुभानी बाहदूर करामतगदूर मुलाजमती होऊन सिरपाव व कौल सरफराजी जाली मं वख्ती हमराह देसमुखानी करजवणे व पायगुडे क॥ मावळ वगैरा विठल व रामचंद्र बावाजी देसपांडिये होनप ता। मजकूर सिरपाव व कौलसरफराजी जाली ते वख्ती आपाजी पिसर नामाजी हाजीर होता त्यास कर्याती मावळीचे देसमुख व मोकदम पटवारी ह्मणो लागले की (पुढें गहाळ)