Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ५७.

श्री.
यादी पेठ नारायणपूर किले पुरंधर एथील सेटियापासी कागद साधनाचे आहेत एणेप्रमाणें.

वराता व पावत्या आहेत एणेप्रमाणें.

कित्ता कागद सन मया व अलफ ११०० यास सन खमस समानीन
मया व अलफ या साला पावेतों वर्षे ८५ त्यांत अन्वय.

रामचंद्र नीळकंठ अमात्य याणी छ १५ जिलकादी बाळाजी विश्वनाथ सरसुभेदार यास पत्र लिहिलें त्यांत अन्वय कीं बाबसेटी सेटिये बिन गोपाळसेटी सेटिये इ.इ.इ.

बाळाजी विश्वनाथ सरसुभेदार व कारकून प्रा। पुणें व माहालनिहाय यांचें पत्र माणकोजी बिन दतसेटी सेटिया पेठ नारायणपूर ता। करेपटार यास आहे. त्यांत अन्वयकीं सालगुदस्ता सन तिसामध्यें राजश्री पंतसचीव यांचें आज्ञापत्र सुभाच्या नावें सादर आहे तेथें आज्ञा कीं इ.इ.इ. छ ५ जिल्हेज, सन मया व अलफ.