Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ५१.

बीटल.
१६४२

दर्या बै॥ मोकदम देहू त॥ हवेली प्रा। पुने स॥ ११३० साहेबाचे बांदगीस कतबा लेहून दिधला ऐसा जे सटवोजी व बालोजी व॥ चापसेट सेटे यास आपण हाजीरजमान असो सबब मौजे म॥र श्री आहे त्यास इनाम सेटे मजकुराच्या मिरासीच्या सेतात कास मन । = ॥ साडे सात मो। बिघे १५ पंधरा आहेत त्याची कीर्द श्री नारोबा गोसावी करऊन भोगवटा श्रीच्या खर्चास करीत आले असतां दरमियान सेटिया गोसावियासी भांडो लागला की आपल्या थलांत सेत इनाम नाही त्यावरून साहेबी मौजेमजकुरी मुकाम करून सुमाकुल पांढरीच्या मुखे करीना मनास आनिला श्रीचे इनाम खरेखुरे जालेयाउपरि सेटियास भांडावयास दरकार नाही. गवामधे कीर्द करून सुखरूप असावे ह्मनऊन जमान मागितला त्यांवरून आपन हाजीरजमान जालो असो जाए पले तर सेटीमजकुरास हाजीर करून नाही तर याचा जाब करून हा कतबा सही

नि॥ नागर बि॥ कुलकर्नी मौजे म॥र

लेखांक ५२.
श्री.
१६५० आश्विन वद्य ३

श्रीमत् माहाराज राजश्री नाना स्वमींचे सेवेसी

विनती सेवक तान्हाजी सोमनाथ साष्टांग नमस्कार स्वामीचे कृपेकरून ता। छ १७ माहे रबिलावलपर्यंत सेवकाचें वर्तमान यथास्तित असे. विशेष-राजश्री आपास पत्र पाठविले तें उभयतास निवेदन करून उत्तर पाठविलें आहे. सांप्रत दरबाचें वर्तमान तरी रा। आपाची स्वारीस पूर्वी जावयाची बोली होती प्रस्तुत घालमेल जाली आहे खासा राव जाणार आहेत एक बोली की गुजरातप्रांतें जावें एक बोली की कर्नाटकप्रांतें जावें असे दोन विचार आहेत अद्यापि सिध्दांत जाहाला नाहीं. राजश्री आंबाजीपंत तात्या पूर्वी बागनीस राजदर्शनास घेऊन गेले होते त्याचे राजदर्शन करून आले. मागती छ १५ रोजी मंगलवारीं दीड प्रहर रात्रीं रायाचा राजश्रीपासी निरोप घ्यावयास सातारियास रवाना केले आहेत तेथोन निरोप घेऊन आलियाउपरी दोही विचारांतून एक विचार होईल. उदाजी पवार मंगलवारी बागणीस आले त्यास हि कर्नाटकप्रांतें बराबरी नेणार आहेत. आश्विनबहुल सप्‍तमीचा मुहुर्त पाहिला आहे. परंतु सप्‍तमीचें जाणे होता दिसत नाहीं कदाचित् डेरे मात्र बाहेर देतील तर स्वामीनीं शुक्रवारी आलें पा। सेवेसी श्रुत जालें पा। सेवेसी विनंति बहुतेक प्रधानपंताचें प्रतिपदेपावेतों राहणे जालें हे विनंति

अपत्य सदाशिवानें चरणावरी मस्तक ठेऊन सिरसाष्टांग नमस्कार राजश्री तान्हाजीपंत यानीं वर्तमान लिहिलें आहे त्यावरून सेवेसी निवेदन होईल हे विज्ञापना.