Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ४६.

श्रीशंकर
१६२९ कार्तिक वद्य ३.

स्वस्ति श्री शिवराज्याभिषेक शके ३४ सर्वजित नाम सवछरे कार्तिक बहुल तृतीया मंदवासरे क्षेत्रिय कुलावतास श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी यानिं मा। मेघशाम विसाजी देशपांडे व म॥ मुकुंद कान्हो देशपांडे प्रा। पुणें यांसि आज्ञा केली ऐसी जें तुमचे विशई राजश्री रखमाजी यसवंतराऊ अत्रे तुमचे गुमास्ते यानिं अहमदनगरचे मुकामी विनंति केली प्रा। मजकूरचे देशपांडिये पुरातन स्वामीचे सेवक आहेत हाली हि सेवेसी यावयाचे उमेदवार आहेत यांसि अभयपत्र सादर केले पाहिजे ह्मणउनु कितेक प्रकारें विनंति केली त्यावरून स्वामिं तुह्मावर कृपाळू होउनु अभयपत्र सादर केले असे तर तुह्मी कोण्हेविशई शकअंदेशा न धरिता बेशक होउनु सुखरूप राहणें स्वामी मजली दर मजली पुढें येतात तर तुह्मीं भीमातीरास अगोधर दर्शनास येणें दर्शन जालियावर तुमचें वर्तमान मनास आणून पारपत्य तुमचे मुद्देमाफीक करून देणें ते दिल्हे जाईल अभय असे छ १६ साबान.

लेखांक ४७.
श्री.
१६३२।१६३३.

तकरीरकर्ते तान्हाजी बिन माऊजी जगथाप मोकदम मौजे बेलसर प॥ सासवड सु॥ इहिदे असर मया अलफ. साहेबाचे सेवेसी तकरीर लेहोन दिल्हा ऐसा जे साहेबी हुजूर बोलाऊन हुकूम फर्माविला की गरुडाचा व तुझा मोकदमीचा कथळा लागला आहे तर तू आपला करीना लेहोन देणे ह्मणोनी रजा फर्माविली तर आपण पिढी दर पिढी सात पुरुशपावेतो मोकदमी करीत आलो आहो. त्यास आपला मूळपुरुश होनाजी जगथाप त्याचा लेक माऊजी त्याचा लेक मालजी त्याचा लेक नासोजी त्याचा लेक बालोजी त्याचा लेक भाऊजी त्याचा लेक आपण तान्हाजी. एणेप्रमाणे मोकदमी मौजे मजकुरीसी करीत असता नरसोजी आपला पणजा मोकदमी करीत असता संभाजी गरूड याणे पुणियामधे मिरासाहेब होता त्यापासी जाऊन फिर्याद जाला की, मौजे बेलसरची मोकदमी आपली आहे. नरसोजी बलेंच खाते त्याजवरून नरसोजीज तलब करून पुणियास नलेले आणि संभाजी गरूड यास हुकूम फर्माविला की तुझा इनसाफ गोतावर टाकिला आहे; गोतात जाणे. त्यावर संभाजी बोलिला की आपण गोतास रजाबंद नाही, साहेबी आपणास दिव्य दिल्हे पाहिजे. त्यावरून प॥ सासवड येथील देशमुखदेशपांडियास हुकूम केला की मौजेमजकुरास जाऊन पांढरीवर संभाजी गरूड यापासून दिव्य घेणे. त्यावरून देशमुखदेशपांडे प॥ मजकूर पांढरीस एऊन श्री सिधेस्वर देव यासंनिध संभाजी गरूड यापासून दिव्य करविले. संभाजी खोटा जाला. त्याउपरि आपण मोकदमी चालवीत असता माहाराज राजश्री छत्रपति स्वामी थोरले कैलासवासी याजपासी हरवाजी गरूड जाऊन हयाळ जाला. त्यावरून माहाराजस्वामीनी बाजी घोलप हवालदार किले पुरंधर यास हुकूम केला की हरवाजी गरूड याचा इनसाफ करणे त्यावरून बाजी घोलप यांणीं आपला बाप माऊजी पा। यास किलेमजकुरास बोलाऊन भोंवर गावीच्या सडी व समाकुल पांढरीस गेही मनास आणून मनसुफी केली हरबाजी गरूड खोटा जाला तो मनसुफीचे कागद आपणापासी होते ते माधवराउ किलेदार अजमगड तांब्राच्या निसबतीने आला त्याणे गाव लुटिला ते समई कागदपत्र होते ते गेले अलीकडे गोंदजी गरूड राजश्री जाधवराऊ सेनापती याकडे लस्करांत चाकर राहून जोरावीने इनसाफ न करिता कागदपत्र करून घेऊन आले, निमे मोकदमी खात आहे. एणेप्रमाणे आपला करीना आहे साहेबी सेरीकरासी बरहक इनसाफ करावया हुकूम फर्माविला पाहिजे. हा करीना लेहोन दिल्हा सही