Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ४४.

श्री
१६२५ वैशाख शुध्द ७.

माहाराज राजश्री पंत
स्वामीचे सेवेसी :-

अर्जदास सेवेसी सेरीकर नारायणजी देसमुख जगथाप कसबा व कर्यात सासवड दोनहि कर सोडून साष्टांग दंडवत विनंति सु॥ सीत मया अलफ साहेबाचे नेक नजरेकरून सेरीकराचे वर्तमान ता। छ ५ माहे माहे मोहरम पावेतो यथास्तित असे

हकीकत आपण राहूजी पाटिल व मालजी पा। ऐसे पुरंधरास वसूल रुजू करावयास गेलो तेथे चिंतो महादेऊ इही किलेदाराची निशा करून आह्मावरी तुफान केले की पहिली खंडणी केली ते रद आहे आपला तनखा आठ हजार भरून घेणे ऐसे किलेदारास सांगोन आह्मा अवघियास कैदेत घातले आणि आम्हास राजकारण लाविले की तुह्मी ऐसे सांगणे की आपले वडिल पूर्वी कुलकर्णी होते ऐसे देवलांत सिरोन बोला त्यास आह्मी विचार केला की हा घरे बुडवावयास गावावरी उठला आहे ए समई गाव वाचवावयाच्या मतलबा सारिखे बोलोन गावास जावे त्यास देवलात सिरोन राहूजी पाटलाने माल घेऊन बोलिला की आत्रिया आधी आमचे वडिल ह्मणत होते की पुरंधरे गावांत होते त्यास मागती चिंतो महादेऊ याणी देउलातून निघालिया उपरि अह्मास पनास तोपची मोकल देऊन गडावरी नेऊन मागती हुनरवंदी करून आमचे माथा तीन हजार रु॥ खंडणी ठेविली त्यास चिंतोपंतास ह्मटले की आजी गैरहंगाम पहिलेच खंडणी होऊन गेली मागती खंडणी बोलिी नाही तथापि तुह्मी आह्मास कुलकर्णाबदल आडवून गोही करवितोस ते हि केली मागती आमचे सिरी टका ठेविला हे बरे नव्हे त्यास आह्मी बल धरिले की आमच्या गरदाना मारूत बंदीखाना कबूल करून कतबा केला मालजी पाटिल भेला टका कबूल केला कतबा लेहून दिल्हा त्यास चिंतोपती हुनरवंदी केली की गावात टका वसूल होईना आपण हजार रुपये गावीचे हातीचे देऊन त्यास आह्मास तश्रीफा देऊ लागला त्यास आह्मी कबूल केल्या x x x त तेव्हा गावात एऊन तश्रीफा x x x ला ते समई तश्रीफ द्यावयास x x x केला त्या तो होडगे तीन हजार रु॥ खंडणी तुह्मी केली ते रु॥ देणे किलेदार जमान आहे माझी जमानत उगवा ऐसे बोलो लागला मग तश्रीफा घेतल्यावरी महजर त्याणे आपल्या चौघा x x x महजर केला त्यास सिका करावया लागला तेव्हा निदान मांडिले सिका x x x स आपण माघारे घेतले की हुजूरापासी पुरंधरे खोटे जाले असता x x सिका केलिया आपले गर्दनेवर एईल त्यास ह्मटले की तुह्मास कोठे पाहाव x x अवघिया भावानी व आपण विचार केला की याणे आमचे सिरी हडोगे x x x रु॥ ठेविले त्यामधे हजार वसूल x x दोन हजार रुपयाचे दिवाणात अवघे भाऊ देऊन मुदती फुरसती घेऊन तेव्हा आठा दिवसा x x प्रा। मुदती केली आणि दोन हजार रु॥ x x लिहून दिल्हे की चौघे भाऊ आह्मी देऊ त्यावरी सिका करावयास फडास आपला धाकटा भाऊ सुलतानजी पाठविला त्यास सुलतानजीपासून खतावरी x x x घेतली आणि आपला भाऊ याजपासून घरी महजर केला होता त्यावरी सिका तेच समई करून घेतला हे आपणास कांहीं ठावके नाही त्यास चिंतोपंत गडास जाता रा। नारो त्रिमळ सभासद यांसि भेटीस बोलाऊन सांगितले की आपण महजरावर सिका घेतला तुह्मी आमचे हातीचे राजश्री पंतास निर्णूक करून लेहा तेव्हां नारोपंती चिंतोपंत गेलियावरी आपणाजवळी पुसिले की तुह्मी दोन हजार रु॥ मुदतीवार लिखत लेहून दिल्हे आणि महजरावरी सिका काय बदल केला त्यास हे आपणास ठावके नाही व आपण ते समई फडास हि गेलो नाही झाले वर्तमान सेवेसी लिहिले आहे यामधे आमचा गुन्हा काही नाही साहेबी आपली वर्तणूक जे आहे ते राजश्री नारोपंतास पुसिले पाहिजे या कुचिद्यामधे जे असतील त्यास साहेब इनसाफ करून ज्याचा गुन्हा असेल त्यास नतीजा द्यावयास साहेब धणी आहेत वरकड आमचे वाडवडील सांगत गेले आहेत की आत्रे पाच सात पिढिया वतन खात आहेत या पूर्वी गिधवे कुलकर्णी होता तो निपुत्रिक जाला ते समई त्यापासून कुलकर्ण हे करितात हे गोष्टीस आह्मी चुकून तरी गुन्हेगार चिंतो माहादेऊ किलेदारापासी चाकरी करून आह्मास नाना प्रकारी आटितो पिटितो हे साहेबीस आमचा इलाज नाही जाल्हे वर्तमान सेवेसी लिहिले आहे यास साहेब धणी मायबाप आहेत सेवेसी श्रुत होए हे अर्जदास.