Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ४१.

श्री.
१६२२ आश्विन वद्य १०
पातशाह
रामराम

छ श्रीमंत प्रौढप्रतापदिनकर खंडेस्वरी सदायशवंत गोब्राह्मणप्रतिपालक निराधारियासि आधार माहाराज राजमान्य राजश्री नरसिंगराउळ ता। र॥ गोविंदराऊ राउळ देसमुख व ता। राजश्री होनप देशपांडिये प्रा। पुणे व मोकदम सेटिये व माहाजन माहास्थल क॥ मजकूर स्वामिगोसावियासि सेवेसी सेवक मोकदम व सेटिये व माहाजन माहाप्रस्णिक माहास्थल क॥ रांजणगौऊ सा। जुनर विनंति उपेरी ऐथील क्षेम जाणौनु माहाराजे आपुले* लिहिती आज्ञा केली पाहिजे या नंतर विनंति की राउळी स्थळमजकुरास गवरसेटी व मानाजी बांधा या हरदोजणामधे सेटियेपणाचे भांडण व करकसा आहे ह्मणौनू राउळी आपली चिरपत्रें देऊन स्थलमजकुरास पाठविले यासि नेमाप्रो। उभे वर्गे स्थळी हाजीर होऊन पत्र देऊन आपलाली हकीकती निवेदन केली त्याजवरून यांची उत्तरे मनास आणिली शोधी पाहिली यासि हे हरदोजण साहेबाच्या सडीस राजी जाले की सडी आपले विशई लेहोनु पाठविजे ते सडीचे प्रतिउत्तर जाबू एईल तेणेप्रमाणे हरदोजण वर्तोन ऐसे राजी होऊन राजीनामे लेहोन दिधले ते स्थळी ठेवून सडीची पध्दती जैसी आहे त्या प्रकारे लेहौनु सडी मलारि गुरव याजबराबरी पाठविली त्यासि ते सडीचे प्रतिउत्तर राउळी लेहोन पाठविले त्यासि ते सडीमधे उधार करून तुह्मी लिहिले की या हरदोजणास क्रिया देणे क्रिया दिधलियाने या हरदोजणाजा मामला चुकत नाही ऐसे प्रतिउत्तर पाठविले सबब की गवरसेटीने क्रिया करावी की आपण बाजीसेटियांच्या घरातील होए सेटपण आपले ह्मणौनु क्रिया करावी. व मानाजी बांधा याने क्रिया करावी की गवरसेटी बाजी सेटियाचे घरातील नव्हे सेटियेपण आपले. ह्मणौनु क्रिया करावी, एणेप्रमाणे लेहोन सडीचा जाबु पाठविला त्याजवरून यां हरदोजणास क्रिया दिधली क्रिया हरदोजणानी केलियां सबब की गवरसेटीनें न्हाऊन धुऊन देवळांत उभे राहोन क्रिया केली की आपण बाजीसेटियाच्या घरातील होए त्याच्या दुखमाचा अगर त्यांचें बादीचा परंतु बाजीच्या घरातील खरा ऐसी क्रिया केली जरी यासि काही असते असेल तरी श्रीदेवमसीद आपणास क्रियां लावील ऐसी क्रिया गवरसेटिनें केली तयाजवरी मानाजी बांधा यानें क्रियां केली की बाजीसेटिया कदीम खरा परंतु त्याचे बुडाले आपणास देणे सेटियेपण हजरती.

जीचे देणे आपणास आहे ऐसी क्रिया केली हे खरे. यांसि असत्य असेल श्रीदेवमसीद आपणास क्रिया लावील ऐसी क्रिया एणेप्रमाणे मानाजीने केली त्यासि क्रियेचा सिरस्ताप्रमाणे रोज पंधरा १५ मुदती करून दसरत पंचरत लेहोन ठेऊन तेणेप्रमाणे राजीनामे ठेऊन देवळात दोन्ही बाजून दोघे बैसले इ॥ छ ९ माहे रा।खर अधिकवदि ११ वार सुक्रवार त॥ छ २४ माहे मिनहू रोजा पंधराची सीमा केली रोजा पंधरामधे ज्यासी देव क्रिया एथे अगर आपले घरी गावी ज्यासी लागेल त्याने त्यांच्या अपमानाचा जाबु करावा आणि वतन जो खरा होईल त्याने खावे ऐसा करार करून क्रियेस बैसले त्याजवरी क्रिया केलियावरी रोज ५ पांचा वार मंगळवारी दो पहरां रात्री मानाजी बांधा निजेला होता त्यासि मानाजीबावा उसणावला की माझ्या उरावरून उठ उठ ऐसे दोनदा उसणावला त्यासि यांचा चुलता सिऊसेटी बांधा याने जागा केला की मानाजी ऊठ एका आंगावरी नीज ऐसें बोलिला आणि मानाजीस जागे केले त्याजवरी रोज पंधरा नेमा प्रो। जाले मग पारी बैसौन मुजावरी सैद मकदूम मुलाणे यासि बोलाऊन जाली हकीकती जे जाली ते त्यानी मुखजबानी सांगितले त्याजवरून वर्तमान जाले ते लेहोन पाठविले आहे आपले गावी तो मजकूर ऐसा या हरदोजणाचे गावी यांचे घरी काय जाले असेल तरी आह्मासि कळले नाही. स्वामि मानाजी याचे गावी काय वर्तमान त्याचे घरीचा काय वर्तमान घेतला पाहिजे या पंधरा रोजामधे इ॥ छ ९ माहे र॥ खर त॥ छ २४ माहे मिनहू या दिवसामधे खबर घेऊन यांची विल्ले *** आपण लाविली पाहिजे जाले वर्तमान लेहोनु पाठविले आहे यांमधे साहेब वडील आहेत जैसा कळेल तैसा विल्हे लाविला पाहिजे हे हरदोजण गवरसेटी व मानाजी बांधे हे उभे वर्ग साहेबापासी पाठविले आहेत बहुत काय लिहिणे कृपा निरंतर असो दीजे हे विनंति सके १६२२ विक्रम संवछरे आस्विन वदि १० वार शेणवारी लि॥ असे पत्री वोळी सुमार ६७ सदुसस्टी रास.